पूणे प्रतिनिधी: दत्तनगर जांभुळवाडी रोडवर गवळीवाडा येथील पावसाळी चेंबरच्या साईटला वारंवार खड्डे पडत आहे. 8 दिवसात 2 वेळा ह्या चेंबरचे काम करण्यात आले, परत एकदा पंधरा ते वीस च दिवसांमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची वेळ आली, अतिशय घाणेरड्या पद्धतीमध्ये पुणे महानगरपालिकेचे कामकाज सुरू आहे. निष्कृष्ट दर्जेचे काम या ठिकाणी होत आहे. त्यांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी कोणीच वाली नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. पालिकेचे अधिकारी सध्या मलई खाण्यात व्यस्त दिसत आहे. नागरिकांना सुविधा देण्याची मोठी जबाबदारी कर्मचाऱ्यांवरती असते, पण पालिका कर्मचारी कुठलेही जबाबदारी प्रामाणिकपणे काम करण्यास तयार नाही. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अधिक अधिक गुंतत आहे. असा आरोप आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केला







