पुणे, दि.१९:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस आयुक्त अमितेश कुमार व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर, हिंमत जाधव, विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुणे विमानतळ येथून साताराकडे प्रयाण झाले.