पुणे प्रतिनिधी:पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. तसेच पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त शहर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.