गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाईअशोक लेलँड कंपनीचा बडा दोस्त पिकअप जप्त; ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
गेवराई : बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाईच्या आदेशानुसार गेवराई पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा बडा दोस्त पिकअप वाहनासह एकूण ₹8,06,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जून 2026 रोजी रात्री सुमारे 2.00 वाजता गेवराई शहरातील कोल्हेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ पेट्रोलिंग सुरू असताना MH-16-CD-2591 क्रमांकाचा पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड बडा दोस्त पिकअप संशयास्पद अवस्थेत आढळला.वाहनात कोणत्याही परवानगीशिवाय अवैधरित्या नदीची वाळू वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने वाहन बाजूला उभे करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन अज्ञात चालक व मालकाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अतुलकुमार तांगडे, प्रपोउपनि. सुरेश पारधी, पोहेकॉ. गोरेक्ष डोके, पोहेकॉ. रामराजे काकडे, पोहेकॉ. दत्ता भंडारे आणि पोहेकॉ. नारायण सरवदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.







