राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामाध्यमातून विधानसभा मतदार संघनिहाय दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात दि. १ जून २०२३ ते दि. १५ जून २०२३ या कालावधीत हा उपक्रम राबवण्याचे नियोजित आहे. नागरिकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या निर्देशानुसार, ‘फर्स्ट इन… फर्स्ट आऊट’ या सूत्रानुसार दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, सर्व्हर डाउन आणि दाखले वाटप करण्यासाठी प्रणालीत केलेला बदल तसेच, उपक्रमाला मिळालेली मुदतवाढ या अनुशंगाने दि. १५ जून रोजी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे नियोजित दाखले वाटप कार्यक्रम रद्द केला आहे.
तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघात जुलै- २०२३ मध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड संबंधित, श्रावण बाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजना याबाबत गावनिहाय कॅम्प लावण्यात येणार आहेत, असेही डॉ. अर्चना निकम यांनी सांगितले.
प्रतिक्रिया : भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या १५ दिवसांपासून शासन आपल्या दारी उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमाला राज्य शासनाकडून मुदतवाढ मिळाली असून, संबंधित दि. १५ जून २०२३ रोजी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी या ठिकाणी नियोजित दाखले वाटप कार्यक्रम स्थगित केला आहे. आम्ही तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. सदर लाभार्थींना पुढील १५ दिवसांमध्ये दाखल्यांचे वाटप घरपोच करण्यात येणार आहे. तसेच, जुलै महिन्यात गावनिहाय कॅम्प लावण्यात येणार आहे. – डॉ. अर्चना निकम, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड.






