पुणे महानगरपालिका संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात स्वच्छताच नाही तर विद्यार्थ्यांनी राहायचं कसं ? मुलांनी शिकायचं कसं? असा प्रश्न वसतीगृह पाहिल्यानंतर उद्भवतो. या ठिकाणी पाहणी केली असता बांधकामाची झालेली दूरावस्था, पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, घाणेरडा वास येणे, टॉयलेट रोज दोन वेळा साफ करणे अपेक्षित आहे, परंतु आठवड्यातून एक ते दोनच वेळा साफ होताना दिसते. ड्रेनेज पाईपलाईन बिल्डिंग वरून खाली उतरते ती जागोजागी लिकेज आहेत. बिल्डिंग वरती अनेक झाडे उगवताना दिसतात.
मुलांच्या रूम मध्ये ढेकणांचा सुळसुळाट असून मुलांच्या हाता पायाला चावा घेणे, सीसीटीव्ही कॅमेरे चालू नसणे, काही मुले बेकायदा वास्तव्यास राहतात, शिवीगाळ करणे, व्यवस्थापकास धमकावणे,अपमानीत करणे, इलेक्ट्रिक गाडी चार्जिंग लावणे, हॉस्टेलचा वेळ संपल्यानंतर रात्री उशिरा घुसखोरी करणे असे प्रकार या हॉस्टेलमध्ये होतात.आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी करण्यात आली त्यावेळेस महासचिव अक्षय शिंदे सतीश यादव सचिव शंकर थोरात उपाध्यक्ष अभिजीत
गायकवाड युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे सुभाष करांडे यांनी पाहणी केली यावेळी पालिकेकडून अधिकारी जीत पवार शिपाई सचिन शिंदे उपस्थित होते. या हॉस्टेलमध्ये अनेक गैर प्रकार चालत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा होती. या हॉस्टेलमध्ये २०१८ पासून रेक्टरची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे होत असलेले प्रकार आणि इथल्या सुविधाचा अभाव दिसून येतोय. आम आदमी पक्षाकडून पालिका आयुक्तांना आणि पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून याची कल्पना देणार आहे. असे प्रकार थांबल्यास बाहेरगावावरून येणाऱ्यां मुलांची सोय चांगल्या प्रकारे होईल .
आत्ताच नव्याने विविध कामांचे टेंडर काढण्यात आले आहे. या बिल्डिंगचे विकास काम मागील पंधरा दिवसापासून सुरू आहे. हे काम कासवाच्या गतीने ठेकेदार करताना दिसतात.फुगवण्यात आलेल्या पुर्वगणन पत्रकापेक्षा कमी रकमेचे टेंडरच्या गुणवत्तेवर परीणाम होण्याची दाट शक्यता आहे. गुणवत्तापूर्ण कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच तातडीने काम वेळेत पूर्ण करण्यात यावे.शिष्टमंडळ यावरती लक्ष ठेवून असेल कुठेही दिरंगाई आढळल्यास आवाज उठवून त्याचा विरोध केला जाईल असे वक्तव्य करण्यात आले.