शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप आणि श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक आणि नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, व नागरिक आदी उपस्थित होते






