ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नवीन वर्षाची पहिली सभा दिनांक.8/2/2025 रोजी YMCA येथे सकाळी 10ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडली.अध्यक्ष …. ऍडव्होकेट श्री बाजीराव दळवी आणि उपाध्यक्ष ऍडव्होकेट श्री संजय साळवी यांच्या उपस्थित सभेचे कामकाज पार पडले.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. सर्व नवनिर्वाचित नोटरी वकिलांचे अभिनंदन केले.ऍडव्होकेट श्री जॉन रोझारियो आणि ऍडव्होकेट जोसेफ फर्नांडिस यांनी या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर केले होते.सर्व वकील बंधू भगिनींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला .तसेच चर्च आणि कायदा यांचे संतुलन कसे साधता येईल,लग्न व्यवस्था , आणि त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन, तसेच कौटुंबिक सलोखा ह्या विषयांवर कशा पद्धतीने कार्य करता येईल ह्यावर सूचना करण्यासाठी वकील बंधू भगिनींचे विचार जाणून घेतले तसेच कार्य अधिक उत्तम रीतीने होण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन केले. विचारांची देवाणघेवाण झाली.खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली सभा संपल्यानंतर सहभोजनाचे आयोजन केले गेले होते जेवण अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होते.ह्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित नियोजन करून ते कार्य उत्तम रित्या पार पाडण्यासाठी ऍडव्होकेट जॉन रोझारियो आणि ऍडव्होकेट जोसेफ फर्नांडिस यांनी विशेष योगदान दिले . या सभेचे संपूर्ण नियोजन अतिशय सुंदर रीतीने केले गेले होते .सकाळी 10 वाजता सभा सुरू होऊन 3 वाजता संपली. सभेची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने आणि सांगता देवाच्या प्रार्थनेने झाली.या सभेला सर्व ख्रिश्चन वकील बंधू भगिनींनी उस्फूर्त पने प्रतिसाद दिला. .अशा रीतीने प्रथम मासिक सभा यशस्वीरित्या पार पडली.







