• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा….

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 20, 2023
in पूणे
0
अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा….
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी पुणे :२०५ , चिचंवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख निवडणूक लढवीत आहेत. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करून जनतेचे लक्ष मुद्यांपासून विचलित करीत असल्याने जनतेच्या मुद्यांवर जाब विचारण्यासाठी आणि राज्यातील घाणेरडे राजकारण लोकांसमोर मांडण्यासाठी निवडणूक हे चांगले माध्यम होते. आणि त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेला तळागाळातील जनतेशी नाळ असलेला सामान्य माणूस निवडणूक का लढवतोय हे जनतेला सांगण्यासाठी सोमवार दि . २०/०२/२०२३ रोजी दुपारी १ वाजता अतिथी हॉटेल , थेरगाव येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . आज पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधन , जनजागृती ,आंदोलनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असताना अनेक मर्यादा येत असल्याने राजकीय भूमिका घेऊन २०५ चिचंवड विधानसभा निवडणूक लढवत आहे. राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देतात .परंतु सिद्दीक शेख यांनी या गोष्टींना फाटा देत जनतेसाठी जाहीरनामा स्टॅम्प पेपर वर लिहून नोटराइज्ड करून जनतेसमोर सादर केला आहे. यामध्ये त्यांनी मतदार संघातील १२ मुद्दे मांडलेले आहेत . ” आपला जाहीरनामा “१) पिंपरी चिचंवड शहरातील अनाधिकृत बांधकाम बाधितांचा प्रश्न व शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणार . २) शासकीय व खासगी दवाखान्यातून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी विधानसभेत ” रुग्ण हक्क कायदा ” मांडणार . ३) खासगी शाळांमधून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवून , सरकारी शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार . ४ पिंपरी चिंचवड शहरातील पवना,इंद्रायणी ,मुळा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविणबर ५) चिचंवड मतदार संघातील वाकड , हिंजवडी ,पिंपळे सौदागर ,काळेवाडी ,डांगेचौक यांसारख्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करून मोठी वाहने , बसेस पार्किंग साठी आरक्षित जागेमध्ये बहुमजली वाहनतळ उभे करून वाहतूक प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार . ६) चिचंवड विधानसभा मतदार संघातील दत्तनगर , सिद्धार्तनगर ,अशोकनगर , एम. बी .कॅम्प , काळाखडक , म्हातोबा नगर , अण्णाभाऊ साठेनगर इत्यादी झोपडपट्यांमधील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन झोपडपट्टी धारकांचे मूलभूत प्रश्न सोडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार ७) पिंपरी चिचंवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रकल्पासाठी जागा व अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करून कचरा प्रश्न सोडणार आहे. ८) चिचंवड मतदार संघामध्ये मराठवाड्यातील बीड ,नांदेड , उस्मानाबाद , लातूर , जालना , औरंगाबाद , परभणी , इत्यादी ठिकाणाहून कामासाठी आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर इथेच स्थायिक झालेले आहेत . मराठवाड्यातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार . ९) चिचंवड मतदार संघातील मुस्लिम बांधवाना २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला कब्रस्तानचा प्रश्न मार्गी लावणार १०) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक कार्य करणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख व मानवतावादी समाजसेविका मदार तेरेसा यांचे स्मारक उभे करणार ११) मुस्लिम , ख्रिश्चन ,बौद्ध ,जैन यांसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांवर वारंवार होणारे हल्ले व अल्पसंख्यांकावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात अल्पसंख्यांक अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायदा विधानसभेत मांडणार १२) सर्व समाजातील थोर महापुरुषांची होणारी बदनामी रोखण्यासाठी सभागृहात ” महापुरुष बदनामी प्रतिबंधात्मक कायदा ” करण्यासाठी प्रयत्न करणार अशा मुद्द्यांवर अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांनी आपले म्हणजे मांडले . जर वरील आश्वासने पूर्ण करू शकलो नाही तर माझ्यावर भारतीय दंड संहिता १९६० कलम १९९ व २०० व अन्य संबंधित कायदयानुसार माझ्यावर खटला भरण्याचा अधिकार जनतेला असेल. अशाप्रकारे नोटराइज्ड करून जाहीरनामा जनतेला जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेत अपना वतन संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड , कार्याध्यक्ष राजू शेरे , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक प्रकाश पठारे , तौफिक पठाण , जितेंद्र जुनेजा , हाजीमलंग शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 119
Previous Post

चिंचवडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून विकासाची कडी पुन्हा जोडणार – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

मतदान शांततेत, सुरळीतपणे आणि उत्साहाच्या वातावरणात सुरु…

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..
पूणे

सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
मतदान शांततेत, सुरळीतपणे आणि उत्साहाच्या वातावरणात सुरु…

मतदान शांततेत, सुरळीतपणे आणि उत्साहाच्या वातावरणात सुरु...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!