पुणेः देशात पावसाने (Rainfall) उघडीप दिल्याने कापसाच्या वेचण्या वेगाने सुरु आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) दबावात आहेत. तर देशातही ७ हजार ते ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.Weed Management : फळ बागायतदारांचे तण व्यवस्थापनातील अनुभवआंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सध्या दबावात आहेत. त्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावर होत आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये महागाई वाढलेलीच आहे. युरोपसह महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कापडाला मागणी घटलेली आहे. युरोपमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेशमधून कापड निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते.मात्र युरोपधील महत्वाच्या देशांमध्ये अन्नधान्यासह, वीज, इंधन आणि इतर वस्तूंचे दर वाढले. अन्नधान्य महागाई वाढल्याने कापड बाजारात शांतता आहे. कापडा उठाव नसल्याने भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून होणारी कापड निर्यातही घटली आहे.अमेरिकेत यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापूस दरात लागेच सुधारणा होईल अशी आशा होती. मात्र कापसाला उठाव कमी मिळत असल्याने दरही दबावात आहेत. जागतिक बाजारात कापसाला मागणी वाढल्यानंतर दर सुधारण्याचा अंदाज आहे. सध्या आयसीईवर कापसाचे वायदे ७७.२८ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत. कापसाचे दर मागील दोन आठवड्यांपूर्वी काहीसे वाढून ८५ सेंटपर्यंत पोचले होते. त्यामुळे कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजार पुन्हा सुधारेल असं वाटतं होतं. मात्र कापूस दरात पुन्हा घट झाली.तर देशात ७ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जात आहे. मागील आठवडाभरापासून देशातील बहुतेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पावसाने ओला होऊन शेतात असलेला कापूस वाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणी करता आली. परिणामी पुढील आठवड्यापासून कापूस आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्यास देशातही कापूसाला आधार मिळू शकतो, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.