डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृति 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. राज्य सरकार महाराष्ट्रातल्या पुरोगामी, संतांच्या विचाराला मातीत घालण्याचे काम करताना दिसत आहे. वारंवार हे सरकार पर राज्यातून आलेले साधु संत महिलांच्या, महापुरुषांच्या, संतांच्या बाबतीत अपशब्द वापरताना सुद्धा दिसत आहे. त्यावेळेस जुलमी सरकार त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाईची भूमिक घेताना आत्तापर्यंत दिसलेली नाही. जितेंद्र आवड यांनी काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला ते अत्यंत चुकीचं होतं पण चुक लक्षात येताच तातडीने त्यांनी आंबेडकर चळवळीशी जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्याकडून झालेली चूक ही जाणून बुजून केले नसून चुकून झाली होती जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या भाषणामध्ये बाबासाहेबांचे विचार प्रचार प्रसार करत असतात झालेली घटना त्याच्या विरुद्ध विरोधक रान उठवताना दिसत आहे. विरोधकांना माझे दोन प्रश्न आहे. ज्या आत्मीयतेने निषेध करत आहे. तुमच्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. का दुसरं आपण मनुस्मृती ही जाळली, जाळणार आहे का तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा झालेल्या घटनाचा निषेध करावा अन्यथा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. बीजेपी सरकार हे ढोंगी आहे. हे संपूर्ण जनतेच्या लक्षात आलेला आहे. असे मत आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनु. जाती प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.