गेवराई प्रतिनिधी – परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील काचेच्या पेटीत असणारे भारतीय संविधानाची प्रस्ताविकचे तोडफोड काही समाजकंटकानी केली हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाले आहे असे समजत आहे तरी शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने त्वरित 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आशा मागणीचे निवेदन आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख बहुजनांचे नेते संजय भैय्या सोनवणे यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेवराई तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले व या आरोपी च्या पाठीमागील मास्टर माईंड कोण आहे शोधा व परभणी पोलिसांनी चालवलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे तसेच निरपराध भीमसैनिकावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू हातागळे तालुका उपप्रमुख लक्ष्मण उमाप तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मस्के अमोल बनसोडे तालुका सचिव भिवा हातागळे. तालुका व शहर प्रसिद्धीप्रमुख .खाजाभाई शेख महावीर घोडके अच्युतराव सुतार नरहरी पालेकर बप्पा धुरंधरे. इमरान सौदागर श्रीकांत तेली बबन उमाप हनीफ शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते