• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 15, 2025
in Uncategorized, आपले शहर
0
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला होणार मतदान

पिंपरी, १५ डिसेंबर २०२५ :* राज्य निवडणूक आयोगकडून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला असून पारंपरिक (ऑफलाईन) स्वरूपात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबवली जाणार असून चार सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठीची निवडणूक आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला ४ मते देण्याचा अधिकार असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या सुमारे १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ५ हजार ७२८ तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ७ हजार ९६६ इतकी आहे. तर इतर मतदारांची संख्या १९७ इतकी आहे. निवडणुकीसाठी २ हजार ४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ करिता ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे. प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ करिता क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ करिता ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणे येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ करिता कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ करिता सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल येथे व प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ साठी ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव येथे आणि प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ करिता पिंपरी चिंचवड बॅडमिंटन हॉल, पी.डब्ल्यू.डी. मैदान, सांगवी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे.महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती कार्यक्रम देखील महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला असून सर्व पात्र मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करावे, याकरिता जास्तीतजास्त प्रयत्न करण्यासाठी स्वीप मोहीम व्यापक करण्यात आली आहे.……*नागरिकांना पाहण्यासाठी अंतिम मतदार यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे**महानगरपालिका मतदार यादी कक्ष :* निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई–पुणे रस्ता, पिंपरी*अ क्षेत्रीय कार्यालय :* भेळ चौक, निगडी प्राधिकरण, निगडी*ब क्षेत्रीय कार्यालय :* पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव*क क्षेत्रीय कार्यालय :* नेहरूनगर, पॉलिग्रास ग्राउंडजवळ, एमआयडीसी, भोसरी*ड क्षेत्रीय कार्यालय :* औंध–रावेत रोड, रहाटणी*इ क्षेत्रीय कार्यालय :* ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे–नाशिक रोड, भोसरीफ क्षेत्रीय कार्यालय :नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी*ग क्षेत्रीय कार्यालय :* तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे, थेरगाव*ह क्षेत्रीय कार्यालय :* मुलींचे आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी

Views: 33
Previous Post

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Next Post

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
Next Post
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!