जीवन जगत असताना कुशल आणि अकुशल कर्म मनुष्य करतो.कुशलकर्माचे फळ उशिरा मिळते पण अकुशल कर्माचे फळ लगेच मिळते.तर काहीना उशिरा तर काहीना लवकर मिळते. बुद्धांच्या काळातील अनेक उदाहरणे देऊन प्रवचन सांगितले. इच्छा नसतांना एखाद्याला मदत करणे म्हणजे अकुशल कर्म होय. भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत सांगताना प्रशांत चव्हाण सर बोलत होते. उपासकांना समजेल अशा सोप्या व सुटसुटीत भाषेत भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत सरांनी सांगितला . भारतीय बौद्ध महासभा-शेवगाव शहर शाखेने १० जुलै आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केले असुन त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक २०/७/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,पैठण रोड,शेवगाव या ठिकाणी वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आज रोजी वर्षावास कार्यक्रमाचे *तिसरे पुष्प* संपन्न झाले. जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ,जिल्हा कोषाध्यक्ष विजय हुसळे सर,जिल्हा शहर सरचिटणीस गौतम पाचारणे,जिल्हा संघटक बाळासाहेब धस,केंद्रीय शिक्षक अरुण भोंगळे त्याचप्रमाणे भा.बौद्ध महासभेचे शेवगाव तालुका सरचिटणीस बाळासाहेब निळ उपस्थित होते.या कार्यक्रमाचं सुंदर असे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शेवगाव शहराध्यक्ष सतीश ठोंबे, सचिव सुनील साळवे, कोषाध्यक्ष आप्पासाहेब सोनावणे,दत्तात्रय निकाळजे,अमोल निळ, यांनी केले.प्रसंगी संजय वाघ, नितीन जाधव,महिला पदाधिकारी कोषाध्यक्ष ज्योती संजय मगर,संघटक किरण मगर व अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ठोंबे यांनी केले तर दत्तात्रय निकाळजे यांनी आभार मानले.







