शितोळेनगर जुनी सांगवी येथे पाणी साचले असून मदतकार्य सुरु आहे

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून याठिकाणी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, निलेश भदाणे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी अधिकाऱ्यांचे पथक शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक सूचना नियंत्रण कक्षामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत






