मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण, अभ्यासू आणि विकासकेंद्री नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात आणखी एका भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्पाची भर पडत आहे.मुंबई–पुणे प्रवास अवघ्या ९० मिनिटांत पूर्ण करणारा ८ पदरी अत्याधुनिक ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग हा केवळ महामार्ग नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचा नवा महामार्ग ठरणार आहे.सुमारे १३० किलोमीटर लांबीचा हा अत्याधुनिक एक्सप्रेस वे रायगड जिल्ह्यातून सुरू होऊन जेएनपीटी (पागोटे) ते चौक महामार्गाशी थेट जोडला जाणार आहे. यामुळे पुणे शहर थेट अटल सेतूशी जोडले जाणार असून राज्यातील दळणवळण, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन वेळ, इंधन आणि आर्थिक संसाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.कनेक्टिंग लिंकनंतर आता या नव्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाच्या माध्यमातून मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांकडे नेण्याचा आपला दृढ संकल्प पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात वेग, गुणवत्ता आणि दूरदृष्टी यांचा संगम घडवत महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनविण्याचे नेतृत्व मा. देवेंद्रजी फडणवीस सातत्याने करत आहेत.







