पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी..
दिवसांन पूर्वी म्हणजे दि. २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. नियंत्रय कक्ष पिंपरी चिचवड कडुन प्राप्त कॉलच्या अनुशंगाने माहीतीमिळाली की, दिघी पोलीस ठाणे हददीत अंदाजे ३५ ते ४० वर्षाची अनोळखी महीला बेशुध्द अवस्थेत पडली असून सदर महीलेच्या डोकयास मार लागला आहे. असे कळविले असता सदर घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलिसनिरीक्षक, शैलेश गायकवाड, पोहवा / ४७९ सानप, पोहवा / ७५५ आढारी, पोहवा / १४५६ भोसुरे, पोशि/ २२९६ जैनक, पोशि/२८७७ मेरगळ, पोशि/ १२८१ कोळेकर, पोशि/ २००१ नांगरे, पोशि/ २८८३ काळे, पोशि/ २३९९ बाळसराफ, पोशि१९४० हनमंते, पोशि/ २२७३ दांगट असे तात्काळ रवाना होवून सदर घटनास्थळी भेट देवून पहाणी केली असता अनोळखी महीला हीचे डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालुन निघृण खुन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. सदर बाबत दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. १९१ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.






