आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बीड जिल्ह्यातील मान्यवर आणि स्वराज्य शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य शक्ती सेनेचे प्रदेश युवक अध्यक्ष बाबुराव बडे, गणेश जी शिंदे समाधान जरांगे पाटील बीड जिल्ह्याचे युवक अध्यक्ष तसेच बीड जिल्हाध्यक्ष माननीय श्री अजयकुमार देडे नवनाथ जी हरे लातूर जिल्हाध्यक्ष लखन शर्मा तसेच बाबा जाधवर जावेद शहा श्री भोसले फुलंब्री तालुकाध्यक्ष समीर शेख युवक जिल्हा उपाध्यक्ष सल्लागार आनंदजी ढाकणे सर राजू शेख असलम शेख निकिता ताई तिडके संगीता ताई जरांगे सीमाताई कुकडे मीनाताई भाकरे पार्वती जरांगे प्रयाग बाई पारडे वनमाला देडे समवेत मोठ्या संख्येने बिडकर उपस्थित होते स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पक्ष हा येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना नेता बनवण्याची भूमिका मांडत युवकांना आणि महिलांना सक्रिय राजकारणात स्थान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संबोधले माझ्यावरती झालेले अन्याय सहन करत करत मी पक्षाची उभारणी सर्वसामान्य जनतेला बीड वासियांना न्याय देण्यासाठी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पक्ष आणि पक्षाची विचारधारा पोहोचवून येणाऱ्या काळात स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवून एका परिवर्तन आणि ऐतिहासिक कामाचे स्वरूप आपल्या नेतृत्वातून करण्याचे संबोधले तसेच महिलांना आणि पुरुषांना मोफत अभिनय प्रशिक्षण संगीत प्रशिक्षण शिवण क्लास प्रशिक्षण कार ड्रायविंग प्रशिक्षण महिलांना मोफत वकिली सल्ला तसेच मोफत रक्तदान अशा माध्यमातून प्रत्येक गावात गाव तेथे शाखा आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना ही सेवा केंद्राच्या माध्यमातून कॅम्प लावून एक डिसेंबर पासून आपण बीड जिल्ह्याचा दौरा करून लोकांच्या योजना लोकांपर्यंत त्यांच्या गावात आणि घरापर्यंत जाऊन फॉर्म भरून त्यांना देण्यात येणार आहेत असे सांगितले विशेष म्हणजे यावेळी बीड जिल्ह्याच्या ब्रह्माकुमारी सेंटरच्या दीदी प्रज्ञा दीदी यांनी विशेष उपस्थिती देऊन शिवबाबांचा आशीर्वाद दिला तसेच आज बीडवासीयांना खऱ्या अर्थाने राज योगनीती काय असते हे त्यांना मेडिटेशन च्या माध्यमातून सात दिवसाचा राज योग कोर्सचे पण जन लवकरात लवकर स्वराज्य शक्ती सेना च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले अशा पद्धतीने खूप उत्साहाने आणि जोमाने बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन समारंभ पार पडले!