स्थानिक गुन्हे शाखा बीड ची उल्लेखणीय कामगिरी
बीड प्रतिनधी लहू बनसोडे दि:१९ अज्ञात चोरटयांनी चापटा बुक्क्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम……..
दिनांक 11/10/2023 रोजी रात्री 01.00 ते 01.30 वा. चे सुमारास शेत नामे डास गट नं 545 मध्ये कवडगाव (बु) येथे ज्ञानेश्वर चिंतामण धायतडे व्य.शेती रा. कवडगाव ता.वडवणी यांना अज्ञात चोरटयांनी चापटा बुक्क्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 94,716/- रु चा मुद्येमाल बळजबरीने चोरुन नेला होता. त्यावरुन पो.स्टे.वडवणी येथे गुरनं 283/2023 कलम 392,323,504,506,34 भादंवि प्रमाणे दिनांक 11/10/2023 रोजी गुन्हयाची नोंद झाली होती. मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी उघडकीस न आलेल्या गुन्हयाचा आढावा घेवुन उघडकीस न आलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांनी अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या गुन्हयांचे विश्लेषण अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढत असतांना दिनांक 19/07/2024 रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, कवडगाव ता.वडवणी येथे शेतवस्तीवर झालेला गुन्हा हा सय्यद जाकेर सय्यद लाल व त्याचे साथीदाराने केला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. तेव्हा तात्काळ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांनी सदर संशयीत आरोपीतांची माहिती काढुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोउपनि खटावकर यांचे पथकास पाचारण केले. पोउपनि खटावकर यांनी बातमी ठिकाणी जाऊन सय्यद जाकेर सय्यद यास शिताफीने पकडुन गुन्हा अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याने व त्याचे इतर तीन साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर आरोपीचे इतर दोन साथीदार 1) बबलु उर्फ अखील सादीक शेख व 2) लखनसिंग शेरसिंग टाक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयात एकुण चार आरोपी निष्पन्न झालेले असुन त्यापैकी तीन आरोपींना स्था.गु.शा. पथकाने पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे.वडवणी यांचे ताब्यात दिलेले असुन गुन्हयातील गेलेमाल व उर्वरित एक आरोपीचा शोध पो.स्टे.वडवणी व स्थागुशा बीड करीत आहे. सदरची कामगिरी ही मा. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, चालक/सुनिल राठोड, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.