पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमाला समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर,भारत सरकारच्या निवडणूक विभागाच्या ब्रॅड अॅम्बेसिडर सोनाली नवांगुळ,मन शक्ती प्रक्षिक्षक डॉ. दत्ता कोहिनकर,विशेष अधिकारी किरण गायकवाड,सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सॅडविक कोरोमंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी किरण आचार्य, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, जागृत अपंग संघटनेचे अध्यक्ष मानव कांबळे,घरकुल अपंग संस्थेच्या पदाधिकारी संगीता जोशी काळभोर,दृष्टीहिन कल्याण संघाचे संतोष राऊत तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.






