बीड प्रतिनिधी :कुर्ला,ता.जी.बीड येथील कुठुंबाच्या उपजीविकेसाठी भंगार वेचणाऱ्या बौद्ध समाजातील वयोवृद्ध प्रल्हाद सोनवणे यांना धेडग्या तु येथेच धाब्या जवळचं सारखे भंगार(बॉटल,लोखंड,कचरा वैगेरे)का वेचतोस म्हणून बेदम मारहाण प्रल्हाद सोनवणे यांच्या नातेवाईकांनी आमच्या बाबा ला मारहाण झालेली माहिती किशन तांगडे यांना सांगून मदत करण्याची मागणी केल्या नंतर किशन तांगडे हे लागलीच तात्काळ दवाखान्यात जाऊन त्यांची अस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना धीर दिला.या नंतर किशन तांगडे हे पीडितांचे नातेवाईक आणि बहुसंख्य कार्यकर्त्या समवेत बीड चे कर्तव्यदक्ष DYSP संतोष वाळके साहेब यांची या प्रकरणी भेट घेऊन त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून पीडितास न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी किशन तांगडे यांच्या सोबत पीडितांच्या नातेवाईका सह युवा नेते सचिन वडमारे,प्रा.डॉ. सिद्धार्थ वाघमारे,ऋतिक कांबळे,सार्थक जाधव आणि सुमित वाघमारे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी 326,324,323,504,506,34,427 आणि 3(1)(r),3(1)(s),3(2)(va) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.