• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 29, 2023
in आपले शहर
0
महापालिकेच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…
0
SHARES
3
VIEWS

शनिवारी गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् आणि रविवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलीस आयुक्तालय यांचा रेकॉर्ड ब्रेक उपक्रम

पिंपरी, पुणे (दि. २९ नोव्हेंबर २०२३) इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत ‘रिव्हर सायक्लोथॉन – २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे आपले ६ वे वर्ष आहे. ‘‘आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित मुक्त करून स्वच्छ ठेवावी’’. या संकल्पनेवर भर दिला आहे. गतवर्षी या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. आमदार महेश दादा लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला असून, प्रतिवर्षी मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता यावर्षी आपण ‘सायकलची सर्वात मोठी रांग’ हे (‘Longest line of bicycles (static)’) हे रेकॉर्ड, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे रेकॉर्ड शनिवारी, दि.२ डिसेंबर रोजी भोसरी गावजत्रा मैदान येथे सकाळी ६ वाजता करण्यात येईल आणि रिव्हर सायक्लोथॉन रॅली ही रविवार, दि.३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता भोसरी गावजत्रा मैदान येथे होणार आहे अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी दिली. बुधवारी पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी रिव्हर सायक्लोथॉनचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे आणि सचिन लांडगे, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. आनंद पिसे, सचिन मरगज, सायकल मित्र पुणेचे बापू शिंदे, संतोष गाढवे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बापू बांगर, वाहतूक विभागाचे साळुंखे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् चे भारतातील फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थातर्फे डब्ल्युटीई इन्फ्रा चे विवेक जोशी, आयआयबीचे ॲड. लोहारे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे प्रेसिडेंट विवेक येवले, लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्डचे सदस्य उपस्थित होते. डॉ. नितीन लोंढे यांनी सांगितले की, रविवारी रिव्हर सायक्लोथॉन तीन विभागात होणार आहे. पाच किलोमीटर, १५ किलोमीटर आणि २५ किलोमीटर असे हे विभाग आहेत. या रॅलीसाठी २५ हजारपेक्षा जास्त सायकलिस्ट येतील असा अंदाज आहे असे नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस करणार सारथ्य…रिव्हर सायक्लोथॉनचे यावर्षीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रॅलीचे सारथ्य पिंपरी चिंचवडच्या पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून लोकांनी रहदारीचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहन सुद्धा या रॅलीद्वारे करणार आहेत. प्रत्येक आठवड्याचा सोमवार हा ‘हॉर्न फ्री’ दिवस पाळून हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण नियंत्रणचा संदेश देता येईल. तसेच प्रत्येक आठवड्याचा बुधवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयुक्तालय आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेणार आहेत. आयोजनात अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड नगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही कार्यक्रमांची माहिती व इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान याबद्दलची माहिती पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा आणि हाउसिंग सोसायटी यांना भेट देऊन दिलेली आहे, असेही दिगंबर जोशी यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ), विनय कुमार चौबे ( पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) व आमदार महेशदादा लांडगे यांनी केले आहे.

Views: 140
Previous Post

सम्राट विचार मंच वतीने संविधान ग्रंथ वाटप करून संविधान दिन साजरा

Next Post

स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!