बोपोडी : स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय हाच संविधानाचा मुळ हेतू आहे. तो जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीला समजावून देण्यासाठी बोपोडीतील सम्राट विचार मंचाच्या वतीने संविधान विषयी जनजागृती आणि घरोघरी संविधान असलेच पाहिजे हि भूमिका संकल्पना गेली दहा वर्ष राबविणारे पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा धम्मसेवकांचा संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रसिध्द कवी भगवान धेंडे यांनी संविधान विषयी गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. अध्यक्ष स्थानी राजेंद्र शेलार प्रमुख उपस्थिती माजी आमदार दीप्तीताई चौधरी, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, ऍड. नंदलाल धीवार, नेते ऍड. रमेश पवळे, ऍड. विठ्ठल आरुडे, आयोजक संस्थापक अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, शशिकांत पांडुळे, डी बी कांबळे, सादिकभाई शेख, ज्योतीताई परदेशी, सुंदरताई ओव्हाळ,राजेंद्र भुतडा, विशाल जाधव, महंमद शेख, विजय जगताप,, मिलिंद माने, करीम तुर्क, आकाश कांबळे, सुधाकर कांबळे, निलेश भालेराव इत्यादी उपस्थित होते.आमदार दीप्तीताई चौधरी म्हणाल्या संविधान वाचविण्या आणि संरक्षण करण्याकरिता सर्वच भारतीयांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज आहे. संविधान टिकेल तर लोकशाही टिकेल या करिता सर्व धर्मियांनी एकत्रित आले पाहिजे.या प्रसंगी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि दै. सम्राट चा गेली 20 वर्ष सातत्याने आपल्या गीतातून, लेखणीतून आणि गायनातून प्रचार आणि प्रसार करणारे भगवान धेंडे आणि बॉडीबिलडींग च्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार विजेते आयु . राजेशजी इरले यांचा स्मुर्तिचिन्ह पंचशील देऊन सन्मान करण्यात आला.ऍड. विद्याताई लोखंडे, पत्रकार सोनाली वाघमारे, स्वाती जाधव, सुवर्णाताई पांडुळे, शशिकला कांबळे, कांताताई ढोणे, अनिताताई कांबळे, कामिनी कुंभार, गोपाळ वाघमारे,संदीप सोनवणे, संजय पवार,शशिकांत भालेराव, सिद्धू शिंदे, इत्यादी मान्यवरांचा संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता सूर्यवंशी, सूत्रसंचालन इंद्रजित भालेराव, आभार विनोद सोनवणे यांनी केले.







