• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील १० विद्यार्थी १९ जुलैपासून जर्मनीतील हेलब्रॉन येथे शाश्वत विकास उद्दिष्टांवर होणाऱ्या दोन दिवसीय युवा परिषदेला उपस्थित…..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 17, 2023
in आपले शहर
0
कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील १० विद्यार्थी १९ जुलैपासून जर्मनीतील हेलब्रॉन येथे शाश्वत विकास उद्दिष्टांवर होणाऱ्या दोन दिवसीय युवा परिषदेला उपस्थित…..
0
SHARES
25
VIEWS

पिंपरी, १७ जुलै २०२३- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील १० विद्यार्थी १९ जुलैपासून जर्मनीतील हेलब्रॉन येथे शाश्वत विकास उद्दिष्टांवर होणाऱ्या दोन दिवसीय युवा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यशाळेत सहभागी होण्याची शहरातील विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ आहे.

दहा दिवसांच्या या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांना त्यांनी केलेले कार्य परदेशातील शिक्षकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून संयुक्त राष्ट्राने नेमून दिलेल्या शाश्वत विकास प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या शाळेसोबत आकांक्षा फाउंडेशन संस्था संयुक्तपणे काम करत आहे. या प्रकल्पातील जलसंरक्षण, स्वच्छता या विषयांवर शाळेतील विद्यार्थी काम करत आहेत. जलसंरक्षण आणि संवर्धनासाठी या शहरामध्ये जनजागृती करणे, प्रदर्शनांचे आयोजन करणे, विविध आराखड्यांद्वारे पाणी वाचविण्याची संकल्पना अंमलात आणणे तसेच स्वच्छतेसाठी कार्यक्रम आखणे असे विविध उपक्रम मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांनी राबविले आहेत.निवड झालेल्या इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ईशा पाटील, ताहुरा शेख, सई लांडगे, ताहुरा मणियार, श्रावणी टोंगे, क्षितीज गुजर, अथर्व भाईप, गौरव पवार, प्रथमेश जाधव आणि आयेशा मुस्तफा यांचा समावेश आहे.

छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक पारिजात प्रकाश म्हणाले, जर्मनी, आफ्रिका, स्पेन, हंगेरी आणि ऑस्ट्रिया येथील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या क्रॉस-कंट्री एक्सचेंज प्रकल्पाचा आमच्या शाळेतील विद्यार्थी गेल्या २ वर्षांपासून भाग आहेत. संयुक्त राष्ट्राने नेमून दिलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करणे या उद्देशातून शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते. तसेच फ्रँकफर्टमधील आंतरराष्ट्रीय युवा परिषदेचाही भाग होण्यासाठी शाळेला आमंत्रण देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांवर सक्षमपणे काम करीत शाळेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा तसेच प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांबद्दल जागरूकता आणि जलसंधारण तसेच शाश्वत मार्गांसाठी गेल्या २ वर्षांत अथक परिश्रम घेतले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला सहभाग ही सुरूवात असून भविष्यात वेगवेगळ्या शाळांचा देखील अशा प्रकारे सहभाग होऊ शकतो, असा विश्वास मुख्याध्यापक पारिजात यांनी व्यक्त केला.

निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांपैकी प्रतिक्रिया देताना गौरवची आई म्हणाली, इयत्ता पहिलीपासून तो महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. आमच्या कुटुंबातील गौरव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारा पहिला सदस्य आहे. हे सर्व महापालिकेच्या आणि आकांक्षा फाउंडेशनच्या पाठिंब्याने शक्य झाले आहे.आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, महापालिका शाळेतील मुलांसाठी ही एक चांगली सुवर्णसंधी ठरणार असुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर वाव मिळणार आहे. शास्वत निरंतर विकास हा एक महत्त्वाचा विषय असुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व या विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. महापालिका शाळेतील मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करुन उत्तम दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रशासन सतत प्रयत्नशील राहील.

मानव आणि ग्रहांसाठी तसेच भविष्यात शांतता आणि समृद्धीसाठी सामायिक ब्लूप्रिंट म्हणून १७ परस्परसंबंधित जागतिक उद्दिष्टांचा समावेश असलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे किंवा जागतिक उद्दिष्टांची रचना केली गेली आहे. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे या उद्दिष्टांची निर्मिती करण्यात आली असून २०३० पर्यंत ते साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

Views: 140
Previous Post

सारथीचे विभागीय कार्यालय व विविध उपक्रम इमारत उभारणीसाठी १७३ कोटीचा निधी मंजूर

Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत १ महिना वाढणेबाबत रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत १ महिना वाढणेबाबत रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत १ महिना वाढणेबाबत रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!