लातूर प्रतिनिधी १५ जूलै २३: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ च्या लातूर येथे उभारावयाचे विभागीय कार्यालय व इतर उपक्रम इमारत उभारणीसाठी १७३ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. मुबंई येथे नुकत्याच पार पडलेल्या उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीत सदरील प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे. माजी पालक मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प मंजूर झालेला आहे. मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या लक्षीत गटाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी स्थापन झालेल्या सारथी (पुणे) संस्थेचे विभागीय कार्यालय लातूर येथे सुरू व्हावे यासाठी लातूर जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री असतांना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रयत्न केले होते. त्याच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात लातूर येथे सारथी विभागीय कार्यालयासाठी २१ पदे मंजूर होऊन या संस्थेमार्फत लातूर येथे उभारावयाच्या वसतीगृह, ग्रंथालय, अभ्यासीका, कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण उभारणीसाठी शासनाकडून चार एकर जागा उपलब्ध झालेली आहे. संस्थेमार्फत इतर आणखी प्रकल्प उभारणीसाठी अतिरीक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सारथी मार्फत लातूर येथे उभारावयाच्या या विभागीय कार्यालय इमारत तसेच इतर उपक्रम इमारत उभारणीसाठी जवळपास १७३ कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला ११ जूलै २०२३ रोजी मुबंई येथे पार पडलेल्या उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली असल्याची माहीती आहे. लातूर येथील सारथीचे विभागीय कार्यालय व इतर उपक्रम सुरू करण्यासाठी लातूर येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेची ४ एकर जागा उपलब्ध झाल्या नंतर त्यासाठी लागणारा १७३ कोटी रूपयाचा निधीच्या प्रस्तावास उच्चअधिकार सचिव समितीने हिरवा कंदील दाखवला आहे, येत्या काही दिवसात अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले प्रयत्न केले जातील त्यामुळे प्रकल्पाच्य कामाल लवकरच सुरूवात होणार होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे यानिमीत्ताने मराठा, कुणबी मराठा समाज बांधवातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.——————————-
सारथीचे विभागीय कार्यालय व विविध उपक्रम इमारत उभारणीसाठी १७३ कोटीचा निधी मंजूरशासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर मराठा कुणबी मराठा विदयार्थ्यासाठी वसतीगृह, ग्रंथालय कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणारमाजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुखयांच्या कार्यकाळातील मंजूर प्रकल्पाच्या निधीप्रस्तावास उच्च अधिकार समितीकडून हिरवा कंदील.