पिंपरी प्रतिनिधी:केंद्रशासनच्या प्रधानमंत्री योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आकुर्डी व पिंपरी येथे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प राबविण्यात आला आहे. सदर प्रकल्पातील घरांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणार्या नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. याकरिता २८ जुलै शेवटची अंतिम तारीख दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ९३८ घरांसाठी राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद आहे. याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालया मध्ये उत्पन्न दाखला व डोमेसाइल दाखला, जातीचा दाखला इत्यादी योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी अर्ज केले आहेत. यामुळे तहसील कार्यलय कामकाजावर मोठ्या प्रमाणात लोड आला असून नियमित वेळेपेक्षा नागरिकांना दाखले मिळण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे. यामुळे अनेक गरजू नागरिक आपल्याला वेळेवर आपले दाखले मिळतील कि नाही या चिंतेत आहेत. आयुक्त साहेब आपण या तांत्रिक गोष्टींचा विचार करता कोणीही गरजू नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता आपण सदर योजनेची मुदत १ महिना वाढवण्यात यावी. सदर विषयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले.






