• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 21, 2023
in आपले शहर
0
महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद
0
SHARES
5
VIEWS

पिंपरी, दि.२१ एप्रिल २०२३:- गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्यातून कुटुंब उभे राहत असते. महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने आयोजित केलेल्या विचार प्रबोधन पर्वामध्ये महारोजगार मेळाव्याचे केलेले आयोजन हे महामानवांना ख-या अर्थाने केलेले कृतीशील अभिवादन आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई) तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवाडी येथील महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये शहरातील सुमारे ५३५ उमेदवारांनी प्रत्यक्ष नोंदणी करून उस्फुर्त सहभाग नोंदवला. त्यापैकी ३७३ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. यावेळी टाटा मोटर्स, महिंद्रा सीआयइ ऑटोमोटिव्ह, केएसबी लिमिटेड, बिव्हिजी इंडिया लिमिटेड यांसारख्या ३८ नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, बानाईचे अध्यक्ष तथा प्रबोधनपर्वाचे संयोजक विजय कांबळे, पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हनुमंत नलावडे, बानाईचे प्रतिनिधी प्रकाश दामोदरे, अनिल सूर्यवंशी, शामसुंदर बनसोडे, राहुल गायकवाड, प्रवीण शिंदे, स्वप्निल काकडे, महेश झगडे, प्रीती यादव, मोरवाडी आयटीआयचे कार्यालय अधीक्षक उमा दरवेश, गटनिदेशक मनोज ढेरंगे, रविंद्र ओव्हाळ , प्रकाश घोडके, ज्योत सोनवणे, मंगेश कलापुरे, निलेश लांडगे, अमोल शिंदे, उज्ज्वला सातकर, अरुण बांबळे, शर्मिला काराबळे, पूनम गलांडे, जीवन ढेकळे, विक्रम काळोखे, यांच्यासह विजय चावरिया, विजय भैलूमे, प्रवीण शेलार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाळासाहेब रोकडे, शाम सोनवणे, दिलीप गुंजाळ, रोहिणी रासकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, बौध्द विकास महासंघ, वही पेन संकलन समिती,भारतीय बौद्धजन विकास समिती यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच रोजगार मेळाव्यासाठी आलेले उमेदवार उपस्थित होते.आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, शहरातील गरजू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते. ही गरज ओळखून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामध्ये विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख तसेच व्यवसायभिमुख व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या ठिकाणी उत्तम पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार आहे. आगामी काळात औद्योगिक आस्थापनांशी समन्वय साधून त्यांना अपेक्षित कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन महापालिकेचा औद्योगिक प्रशिक्षण विभाग अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा मानस आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळवून देण्याचा उद्देश आहे. उमेदवारांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य, मुलाखतीला कसे सामोरे जावे, स्वतःला उत्तम पद्धतीने कसे सादर करावे या महत्वाच्या गोष्टींवर देखील तरुणांनी काम करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बानाईचे अध्यक्ष तथा प्रबोधनपर्वाचे संयोजक विजय कांबळे यांनी केले. तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले. बानाईचे प्रतिनिधी प्रकाश दामोदरे यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश सांगितला तसेच इतर माहिती विषद केली.
Views: 119
Previous Post

महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेआमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन- महापालिका प्रशासनाला मिळणार अल्पदरात वीज

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेआमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन- महापालिका प्रशासनाला मिळणार अल्पदरात वीज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!