

शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई) तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवाडी येथील महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.








