• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महापालिका सेवेतील २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘विंटर गिफ्ट’- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश – मानधन तत्वावरील कर्मचारी वेतनश्रेणीमध्ये समाविष्ट

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 14, 2023
in आपले शहर
0
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार
0
SHARES
19
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत (आरसीएच) मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या २२ कर्मऱ्यांना महानगरपालिकेत नियमित वेतन श्रेणीमध्ये सामावून घेण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे.‘आरसीएच’ अंतर्गत मानधनावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आस्थापनेवर नियमित सेवेत समावून घेण्याबाबत नगर विकास विभागाकडे प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी नवीन पद निर्मिती करून ‘आरसीएच’ कार्यक्रमातील मानधनावरील कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून शासनाची मान्यता मिळाल्यामुळे २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेण्यात आले.माता व बाल मृत्यूचे दर कमी करणे, प्रजनन दर कमी करणे हे उद्दिष्ट घेऊन राज्य शासनाच्या वतीने आरसीएच हा कार्यक्रम राबविला जातो. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २००५ च्या शासन निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्येदेखील प्रजनन व बाल आरोग्य हा कार्यक्रम राबविला जात होता. याच विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याबाबत निर्णय विचाराधीन होता.सन २०१० पासून या कार्यक्रमासाठी १०० टक्के खर्च पिंपरी-चिंचवड महानगर पालिका करीत आहेत. या कार्यक्रमांतर्गत लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एएनएम, लिपिक या पदावर सध्यस्थितीत एकूण २२ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत सर्व आरोग्य विषयक कामे, कार्यक्रमांची प्रसिद्धी, जनजागृती व अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे नागरी भागातील तसेच झोपडपट्टी भागातील नागरीकांचे आरोग्यमान उंचाविण्यास मदत होते. महानगर पालिकेच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ देणाऱ्या योजना राबविण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग उपलब्ध असून, हद्दवाढ तसेच लोकसंख्या वाढीमुळे तातडीच्या कर्मचारी वर्गाची पालिका प्रशासनास नितांत गरज होती.तसेच, सध्याच्या जागतिक महामारीमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे दि. २६ ऑगस्ट २०२० च्या महापालिका ठराव क्र. ५५६ अनुसार आरसीएच कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीत सामावून घेण्यास मान्यता दिलेली आहे. महानगरपालिका सभा ठराव, तसेच सदर कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेत प्रदीर्घ काळ केलेल्या कामाचा विचार करून आरसीएच कार्यक्रमांतर्गत असलेल्या एकूण २२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदनिर्मिती करून नियमित वेतनश्रेणीमध्ये समावून घेण्यात आले आहे.**कर्मचाऱ्यांनी मानले लांडगे, घोळवे यांचे आभार…प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत (आरसीएच) कार्यरत असलेल्या या २२ कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच, कामगार नेते आणि माजी उपमहापौर केशव घोळवे यांनीही कामगारांना कायम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आमदार महेश लांडगे आणि माजी उपमहापौर केशव घोळवे यांचे आभार मानले आहेत.

Views: 124
Previous Post

गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील नवनिर्वाचित उपसरपंच सुनील वाबळे यांची ग्वाही

Next Post

नानासाहेब गायकवाड मोक्का प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
नानासाहेब गायकवाड मोक्का प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

नानासाहेब गायकवाड मोक्का प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!