फलटण, दि. १३ :- सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुनिल वाबळे यांची बिनविरोध निवड झाली. सर्वानुमते सुनिल वाबळे हे राजकारण न करता फक्त लोकांच्या हितासाठी काम करतात म्हणून त्यांची सार्थ निवड करण्यात आली. एक परिपूर्ण आदर्श व्यक्ती ग्रामपंचायतीचा उपसरपंच होत आहे.कोणत्याही कामाची लाज न बाळगता किंवा गावाच्या विकासासाठी कोणतेही काम असुद्या ते करणार म्हणजे करणाच, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर संघर्षातून माणूस कसा तयार होतो, एक राजकारण हा भाग जर सोडला तर एक समाजकारण करताना दिसणारे एक हस्तपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सुनिल वाबळे हेच सर्वांच्या मुखातून निघणारे बोल ऐकू येत होते.सस्तेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाचे योग्य व्यक्ती उपसरपंच झाल्याची ग्वाही समस्त सस्तेवाडीच्या ग्रामस्थांनी यावेळी दिली. निश्चितच बॉडीला लाभलेले सर्वच सदस्य तरुण व शिकलेले आहेत शिवाय गावाचा विकास करायचा असेल तर ग्रामपंचायत निधी असावाच लागतो,परंतु शासकीय निधी मग तो जिल्हा परिषद मार्फत असेल आमदार फंडातून असेल खासदार फंडातून असेल, जिल्हा नियोजन समिती मधून असेल, हे सर्व निधी सस्तेवाडी गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विविध फंडातून भरघोस निधी ग्रामपंचायतीला मिळवून दिला आहे.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सतीश सस्ते (आप्पा) ग्रामविकास अधिकारी श्री सुतार(अण्णा), माजी पंचायत समिती सदस्य श्री. बाळासाहेब ठोंबरे, श्री. रामदादा नाईक निबांळकर, श्री. प्रकाश बापू वाबळे, श्री. युवराज भाऊ कदम, सरपंच सौ. मनिषा चोरमले, मा. सरपंच सौ. रेखा ठोंबरे, सौ. मा. सरपंच ज्ञानेश्वरी कदम, माजी उपसरपंच श्री. बापूराव सदाशिव शिरतोडे, मा. उपसरपंच श्री. संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रताप सस्ते सौ. सिमा विकास करे, सौ. रेवती सपताळे, सौ.मानिनी पानसरे, श्री. विजय विठ्ठलराव सस्ते व श्री.आणासाहेब चोरमले, श्री. नितीन धुमाळ, श्री. अक्षय हणमंत पिसे, श्री. संजय जामदार, श्री.सोनाजी राजगे, श्री.राजेंद्र कदम, श्री. सागर चव्हाण, श्री. अक्षय गंगतीरे, श्री.गणेश मदने, विजय पानसरे, राजेंद्र आडके, बापूराव राऊत, दादा सपताळे, अविनाश लांडगे, हर्षद वाबळे, ऋषिकेश वाबळे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी स्थानिक पातळीवर राजकीय व सामाजिक स्तरावर काम करीत असताना अनेक अडचणी येतात. परंतु गट-तट व राजकारण बाजूला ठेवून या गावाच्या विकासासाठी काहीही अडचणी व समस्या असतील, तर त्या सोडविल्या जातील तसेच गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सुनील वाबळे यांनी दिली.