पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेडीसीन विभागात स्पेशालिटी क्लिनिक नव्याने सुरु करण्यात आले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी मेडीसीन विभागप्रमुख डॉ. प्रविण सोनी, सहयोगी प्राध्यापक डॉ. निरंजन पाठक, डॉ. नरेन्द्र काळे व इतर विषयाचे सर्व विभागप्रमुख, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर, मेट्रन आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.







