• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

उद्योगविश्वाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली “कमिटमेंट”- उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार- पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मागण्यांना मिळणार न्याय

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 23, 2022
in आपले शहर
0
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार
0
SHARES
1
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत दिलेली ‘‘कमिटमेंट’’ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली असून, उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या मागणीनुसार ही बैठक होणार असून, शहराच्या उद्योग विश्वाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उद्योगविश्वात व्यक्त केली जात आहे.काही दिवसांपूर्वी, विविध समस्या आणि मागणींबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले होते.दरम्यान, उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी उद्योगजक मेळाव्यालाही उपस्थिती लावली. यासह भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या सहयोगाने उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत सर्वोतोपरी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासनही उद्योगमंत्र्यांनी दिले होते. विशेष म्हणजे, शहरातील उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी शहराचा अवघ्या दीड महिन्यांत दोनदा दौरा आणि तात्काळ मंत्रालयात बैठक लावणारे उदय सामंत पहिले उद्योग मंत्री आहेत, अशा भावना लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केल्या.पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तसेच चाकण औद्योगिक परिसरातील लघु उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मंत्रालयात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस लघुउद्योजक संघटनांसह लघु उद्योजक सदर बैठकीस उपस्थित राहणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “कमिटमेंट” पाळल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. उद्योगमंत्र्यांकडून संबंधित विभागाचे सचिव तसेच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना देण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध समस्यांसंदर्भात चर्चा होणार आहे.

… या विषयांवर होणार निर्णय1) भुयारी गटार योजना व सीइटीपी प्लांट, 2) खंडित वीज पुरवठा व वीज दरवाढ 3) एमएसईडीसीएलची सहा नवीन सबस्टेशन्स उभारणीबाबत 4) औद्योगिक परिसरातील कचरा समस्याबाबत 5) अग्निशमन केंद्र 6) वाहतूक व्यवस्था (बस सुविधा)7) वाढत्या अनाधिकृत झोपडपट्टी व वाढती अनधिकृत भंगार दुकाने8) वाहतूक कोंडी 9) रेडझोन बाबत 10) शास्तीकर रद्द करणेबाबत 11) महाराष्ट्रात नवीन औद्योगिक गुंतवणूक वाढविणेबाबत 12) महापालिकेकडून देण्यात येणार्या अपुर्या सुविधेबाबत 13) लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध होणेबाबत 14) एक खिडकी योजना 15) सबसिडीबाबत 16) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र 17) औद्योगिक परिसरात होणार्या चोर्यांबाबत 18) ट्रक टर्मिनल जागेबाबत 19) वृक्ष लागवड व संवर्धनासाठी भूखंडबाबत 20) संघटना ऑफिस भूखंडाबाबतही उद्योग मंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views: 119
Previous Post

इंडस्ट्रिअल ॲन्ड रेसिडेंसिअल कॉरीडॉर’ होणार वाहतूक कोंडी मुक्त – समाविष्ट गावांत पर्यायी रस्त्यांचे जाळे विकसित करणार- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना

Next Post

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मेडीसीन विभागात ‘स्पेशालिटी क्लिनिक’ नव्याने सुरु करण्यात आले.

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मेडीसीन विभागात ‘स्पेशालिटी क्लिनिक’ नव्याने सुरु करण्यात आले.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मेडीसीन विभागात 'स्पेशालिटी क्लिनिक' नव्याने सुरु करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!