• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

इंडस्ट्रिअल ॲन्ड रेसिडेंसिअल कॉरीडॉर’ होणार वाहतूक कोंडी मुक्त – समाविष्ट गावांत पर्यायी रस्त्यांचे जाळे विकसित करणार- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 22, 2022
in आपले शहर
0
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार
0
SHARES
11
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवडतून जाणारा पुणे-नाशिक महामार्गावसह इंडस्ट्रिअल ॲन्ड रेसिडेंन्सिअल कॉरिडॉरमधील दिवसेंदिवस वाढणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समाविष्ट गावांमधील मुख्य रस्त्यांना पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करुन वाहतूक सुरळीत आणि सक्षम करावी. त्यासाठी महापलिका प्रशासनाने ताताडीने नियोजन आराखडा तयार करावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केल्या आहेत.याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच नियोजन आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून, त्यामुळे प्रचंड नागरीकरण वाढले आहे. परिणामी, पुणे- नाशिक महामार्गासह भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे ते मोशी पट्टयामध्ये नियमित वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. आगामी ५० वर्षांत वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण याचा विचार करता मुख्य रस्त्याला जोडणारे पर्यायी मार्गांचे जाळे निर्माण केल्यास मुख्य रस्त्यावरील ताण कमी होणार आहे.पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या हेतूने चिखलीमधील साने चौक ते चिखली हा रस्ता २४ मीटर रुंद करावा. चिखली गाव ते सोनवणेवस्ती मार्गे ज्योतिबानगर, तळवडे या रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण करावे. तसेच, नव्याने विकसित करण्यात येणारा कॅनबे चौक, तळवडे ते रेडझोनमधून भक्ती-शक्ती चौकाला जोडणारा रस्ता १८ मीटर रुंद करावा. इंद्रायणी नदी पात्रालगत तळवडे ते चिखली हा सध्या १२ मीटर असलेला रस्ता २४ मीटर रुंद करण्यात यावा. तसेच, चिखली- तळवडे शिव रस्ता विकसित करण्यात यावा. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.**

पर्यायी रस्त्यांद्वारे मुख्य रस्त्याचा ताण कमी करावा…आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचे वाढते शहरीकरण आणि चाकण औद्योगिक पट्टा, तळवडे आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडीचा सामना केल्याशिवाय कोणत्याही चाकण, नाशिकहून येणाऱ्या वाहनचालकाला पुणे शहरात जाता येत नाही, ही आजची स्थिती आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. गेल्या चार-पाच वर्षांत या भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेतल्यामुळे काहीप्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, आगामी ५० वर्षांत शहराचे नागरीकरण लक्षात घेता पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी रस्त्यांवर वळवणे अत्यावशक आहे. केवळ मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करुन चालणार नाही, तर पर्यायी रस्ते निर्माण करुन त्या-त्या भागातील वाहतूक अन्य मार्गावर सुरू करुन मुख्य रस्त्याचा ताण कमी करता येईल, असा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.**

प्रतिक्रिया :समाविष्ट गावांमधील पर्यायी रस्त्यांबाबत भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. जागेचा ताब मिळाल्यावर तरतूद करुन रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येतील. चाकण औद्योगिक पट्टयातून मुख्य रस्त्यावर येणारी वाहतूक विभाजन झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.- विजयकुमार काळे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, फ-क्षेत्रीय कार्यालय.**

प्रतिक्रिया :पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक झाली होती. त्यानुसार सर्व्हेक्षण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, प्रशासकीय कार्यवाही करुन लवकरात लवकर कामे सुरू करण्याची प्रशासनाची भूमिका आहे.- मकरंद निकम, सह शहर अभियंता, स्थापत्य विभाग.**

प्रतिक्रिया :तळवडे ते चिखली २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. सुधारित विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. सुमारे २५ टक्के जागा मनपाच्या ताब्यात असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कार्यवाही चालू आहे. देहू-आळंदी रस्त्यावरील कॅनबे चौक ते मुंबई-पुणे महामार्गास भक्ती-शक्ती चौकापर्यंत २४ मीटर रस्त्याची मागणी होत आहे. तथापि सदरचा रस्ता महापालिका हद्दीबाहेरील रेडझोनमधून जात असल्यामुळे संरक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. चिखली ते तळवडे रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही चालू आहे.- संदेश खडतरे, सहायक संचालक, नगररचना विभाग.

Views: 120
Previous Post

पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली

Next Post

उद्योगविश्वाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली “कमिटमेंट”- उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार- पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मागण्यांना मिळणार न्याय

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार

उद्योगविश्वाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली "कमिटमेंट"- उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार- पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मागण्यांना मिळणार न्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!