पुणे प्रतिनिधी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून गुणवंत कामगार म्हणून तानाजी कांबळे यांचा सत्कार सोहळा संपन्न पुणे महानगर परिवहन pmpml अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा ओमप्रकाश बकोरियायांच्या संकल्पनेतून आज दि. 25/10/22रोजी ट्रनिंग हॉल स्वारगेट या ठिकाणी प्रत्यक्ष मार्गांवर काम करत असताना प्रवाशांन करिता विशेष अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा सत्कार समारंभ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने स्वारगेट आगारातील तानाजी बाबुराव कांबळे कायम वाहक क्र 4131,यांचा या वेळी गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला या वेळी कामगार जनता संपर्क अधिकारी मा. सतीश गाटे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार –पवार मॅडम, व इतर वरिष्ठ अधीकारी कर्मचारी उपस्थित होते. कामगार वर्गातून व स्वारगेट आगार प्रमुख मा. विकास मते साहेब यांच्या कडून सत्कार मूर्ती तानाजी कांबळे यांचे कौतुक करण्यात येत आहे.