• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 10, 2025
in आपले शहर
0
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

हिंजवडी वाहतूक समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक: आमदार शंकर जगताप यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून तातडीचे आदेश

मुंबई, १० जुलै : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. या गंभीर समस्यांकडे विधानसभेत लक्ष वेधत आमदार शंकर जगताप यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१० जुलै) मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाहतूक, मेट्रो, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत अनेक निर्णायक निर्णय घेण्यात आले.३० मीटर पर्यायी रस्त्यासाठी आमदार जगताप यांचा आग्रहआमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत सविस्तर भूमिका मांडत सूर्य हॉस्पिटलपासून वाकडमार्गे हिंजवडी फेज ३ पर्यंत PMRDA हद्दीतून ३० मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता आरक्षित करून विकसित करण्याची मागणी केली.”या रस्त्यामुळे सध्याच्या मुख्य मार्गावरील ५० टक्क्यांहून अधिक वाहतूक डायव्हर्ट करता येईल आणि कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, PMRDA आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांना रस्ता आरक्षित करून लवकरात लवकर विकसित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.नवीन मेट्रो मार्ग व रस्ते योजनांसाठी पुढाकारबैठकीत निगडी मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–चाकण या मार्गासाठी नवीन मेट्रोचा DPR मंजूर करण्याची मागणीही आमदार शंकर जगताप यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, हा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पुढे पाठवण्याचे आदेश दिले.सिंगल पॉईंट ॲथॉरिटीची घोषणाहिंजवडीमधील अनेक शासकीय विभागांच्या समन्वयाअभावी होणारा विकास रखडत असल्याने आमदार शंकर जगताप यांनी एकवटलेल्या नियंत्रण यंत्रणेची गरज अधोरेखित केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ स्थापन करून सर्व विकासकामे एकाच छताखाली आणण्याची घोषणा केली.मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट आदेशमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील महत्त्वाचे निर्देश दिले:* सिंगल पॉईंट ॲथॉरिटीद्वारे सर्व समन्वय* ३० मीटर पर्यायी रस्ता विकसित करणे* डिसेंबर २०२५ पर्यंत हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू करणे* लक्ष्मी चौक पूल सहापदरी करणे* पार्किंग व वाहतूक नियंत्रणासाठी तांत्रिक उपाय* पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक अंडरपासचे काम सुरू करणेआमदार शंकर जगताप यांचा पुढाकार ठरतोय निर्णायकहिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबसाठी भक्कम रस्ते, सार्वजनिक वाहतूक व नियोजन महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी थेट मुख्यमंत्री स्तरावर प्रश्न उपस्थित करत प्रशासन हलवले.त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतरच ही बैठक आयोजित झाली आणि निर्णयाच्या दिशेने वाटचाल झाली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सर्वश्री आमदार शंकर जगताप, शंकर मांडेकर, महेश लांडगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यांच्यासहआयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे, बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UnclogHinjawadiITPark मोहिमेतील प्रतिनिधी, हिंजवडी एम्प्लॉईज अ‍ॅण्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्यासह IT फोरम व सोसायटी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते

Views: 82
Previous Post

तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा हा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – शंकर जगताप

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!