• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 20, 2025
in Uncategorized
0
महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई
0
SHARES
0
VIEWS

सब हेड : पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने शहरात सुरु केली दंडात्मक कारवाई मोहीम

पिंपरी, २० एप्रिल २०२५ : शहरातील नळजोडणीवर अनधिकृतपणे थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० विद्युत पंप धारकांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार कारवाई करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या सूचनेनुसार नळजोडणीवर अनधिकृत विद्युत पंप जोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. शहरातील ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंचवड, बळवंतनगर, शिवनगरी, साईराज कॉलनी, ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी, फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी, सांगवी परीसरातील गणेशनगर, राजारामनगर, समतानगर, पवनानगर तसेच दापोडी परिसरातील गुलाबनगर, पवार वस्ती एसएमएस कॉलनी, नव भारत नगर या परिसरात पाणी पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडल्यास उंच भागात पाणी कमी दाबाने पोहोचत आहे आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार, मनपाच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कठोर कारवाई करीत आहे. चिंचवड मधील बळवंतनगर, शिवनगरी, साईराज कॉलनी परिसरातील अनधिकृत पणे थेट नळाला जोडलेले २१ विद्युत पंपांचे संच पाणी पुरवठा व ब क्षेत्रीय कार्यालयामार्फत जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी उपअभियंता प्रविण धुमाळ, कनिष्ठ अभियंता ऋषिकेश गेंगजे , रघुनाथ शेमले, तुषार सव्वासे, साधना ठोंबरे, स्था. अभि. सहाय्यक मदन फंड उपस्थित होते. ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले ११ विद्युत पंप पाणीपुरवठा विभाग ग क्षेत्रिय कार्यालय मार्फत जप्त करण्यात आले. तसेच १ इंचाचे १ अनधिकृत नळजोड बंद करण्यात आले. कनिष्ठ अभियंता समिक्षा मालपुरे यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर आणि कर्मचारी यांनी कारवाई केली आहे.फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले १० विद्युत पंप पाणीपुरवठा विभाग फ क्षेत्रिय कार्यालय मार्फत जप्त करण्यात आले . ही कारवाई कनिष्ठ अभियंता सचिन लोणे व ओम इंगोले व त्यांच्या पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर आणि कर्मचारी यांनी केली आहे.सांगवी परीसरातील गणेशनगर, राजारामनगर, समतानगर, पवनानगर तसेच दापोडी परिसरातील गुलाबनगर, पवार वस्ती एसएमएस कॉलनी, नव भारत नगर येथील १८ अनधिकृत विद्युत पंप जप्त करण्यात आले. यावेळी उपभियांता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता सागर पाटील, संदीप ढेपले, सोनाली खेमनर, अभियांत्रिकी सहाय्यक प्रतीक्षा बढीये, अजय मखारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.सध्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच नळजोडणीला अनधिकृत पद्धतीने मोटार जोडून पाणी उपसा करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जाऊन वापरा व अनधिकृत पद्धतीने पाण्याचा अपव्यय करू नका. अन्यथा महानगरपालिकेच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. -प्रदीप जांभळे पाटील , अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवश्यक पाणी पुरवठा करत आहे. अनधिकृत विद्युत पंप जोडणीमुळे पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत आहे. यामुळे नळ जोडणीवर अनधिकृत पद्धतीने विद्युत पंप जोडणाऱ्यावर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.- अजय सूर्यवंशी , सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Views: 96
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिलांचे बचत गटांच्या महिलांकडून वाटप सुरू

Related Posts

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
Uncategorized

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली

May 6, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
Next Post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिलांचे बचत गटांच्या महिलांकडून वाटप सुरू

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिलांचे बचत गटांच्या महिलांकडून वाटप सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!