• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर केली जाणार नियमानुसार कारवाई .

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
March 21, 2025
in आपले शहर
0
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर केली जाणार नियमानुसार कारवाई .
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, २१ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.प्लास्टिकमुक्त पिंपरी चिंचंवड मोहिमेचा भाग म्हणून आरोग्य विभाग “ह” क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मधील नवी सांगवी येथील साई चौक भाजीमार्केट येथे प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम घेण्यात आला. तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय येथील प्रभाग क्रमांक २९ मधील लक्ष्मीनगर येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपस्थित नागरिकांना झिरो प्लास्टिक, प्लास्टिक फ्री झोन, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिकचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम, याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले याशिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अशी आहे दंडाची तरतूद बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पहिल्यांदा केल्यास – ५,००० रुपये बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर दुसऱ्यावेळी केल्यास – १०,००० रुपये बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर तिसऱ्या वेळी केल्यास – २५,००० रुपये व ३ महिने करावास.जनजागृतीसाठी पथनाट्य सादरीकरणपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त शहरासाठी विविध ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण देखील करण्यात येत आहे. या पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेबाबत तसेच कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. तसेच बाजारपेठ तसेच व्यावसायिक ठिकाणी ओला व सुका कचरा विलगीकरण करून तो कचरा महापालिकेच्या घंटागाडीत देण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्याबरोबरच ग्राहकांवर दंडात्मक कारवाई बरोबरच कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. आपले शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. – विजयकुमार खोराटे, अतिरिक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणास हानिकारक असून त्यांच्यामुळे कचऱ्याची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे शहरातील विक्रेते व ग्राहक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. – सचिन पवार, उप आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Views: 96
Previous Post

सन्मान पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीचा…

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!