• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

व्यापारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी कटिबद्ध- आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही बनसोडे यांना विजयी करण्याचा सिंधी बांधव व व्यापाऱ्यांचा निर्धार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2024
in आपले शहर
0
व्यापारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी कटिबद्ध- आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही बनसोडे यांना विजयी करण्याचा सिंधी बांधव व व्यापाऱ्यांचा निर्धार
0
SHARES
12
VIEWS

पिंपरी, पुणे (दि. १७ नोव्हेंबर २०२४) पिंपरी कॅम्पातील व्यापारी वर्गामध्ये वाहतूक कोंडी पार्किंग सुविधा नसणे यावरून काहीशी नाराजी होती. मात्र या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याने आम्ही एक दिलाने आमदार बनसोडे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी केले. तर आपण कालही सिंधी बांधवांसाठी व व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध होतो, आजही आहे आणि उद्याही कटिबद्ध राहील अशी ग्वाही पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरीत आयोजित या पत्रकार परिषदेत आमदार उमाताई खापरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, आरपीआय आठवले गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष व जेष्ठ माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वावळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, ज्येष्ठ उद्योजक व पिंपरी चिंचवड व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी, माजी नगरसेवक तुषार हिंगे, संदीप वाघेरे, जगन्नाथ साबळे, हरेश बोधानी, प्रसाद शेट्टी, शितल शिंदे, शैलेश मोरे, जगदीश शेट्टी, रोहित काटे, तसेच पिंपरी कॅम्प मधील व्यापारी किशोर केशवानी, लच्छू बूलानी, जयेश चौधरी, गोपाळ खत्री आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, अण्णा बनसोडे हे लोकांच्या अडचणीला धावून जातात त्यामुळेच मागील वेळी पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी आग्रह करून अजित पवार यांच्याकडून त्यांच्यासाठी उमेदवारीचा आग्रह धरला. पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी पार्किंग सुविधा यावरून व्यापाऱ्यांनी उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्यासमोर पार्किंग समस्या सोडवण्याबाबत आग्रही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे अण्णा बनसोडे आणि व्यापारी वर्गांमधील दुरावा दूर झाला आहे, मनोमिलन झाले आहे. असे बहल यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर असल्याचे सांगतात मात्र सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल अनेकांना अशी पदवी मिळते. अण्णा बनसोडे यांचे ड्राफ्टिंग चांगले आहे, अक्षर चांगले आहे ते शिक्षित आहेत. लोकांच्या समस्या समजून घेऊन कशा सोडवाव्यात हे त्यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरून भांडवल करणे अयोग्य असल्याचे बहल यांनी सांगितले. डब्बू आसवानी म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून पिंपरी कॅम्पात विशेषता राधिका, साई चौकात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न आहे तो सोडवावा अशी आमची मागणी होती. अजित पवार यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले त्यामुळे अण्णा बनसोडे यांना बहुमताने निवडून देण्याच्या सर्व सिंधी समाज बांधव व व्यापाऱ्यांनी निर्धार केला आहे. आमदार बनसोडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला हा विकास करताना सर्व जाती धर्माला विश्वासात घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे अजित पवार हे उमेदवार आहेत असे समजून काम करायचे सर्वांनी ठरविले आहे ज्या नेत्यांना आपण मानतो त्यांचा आदेश मानने महत्त्वाचे असते. बुधवारी (दि.२० नोव्हेंबर) होणाऱ्या मतदानाच्या दिवशी घड्याळ चिन्ह समोरील प्रथम क्रमांकाचे बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन आमदार बनसोडे यांनी केले.

Views: 123
Previous Post

राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने – खा. श्रीरंग बारणे यांचा विश्वास

Next Post

टाटा मोटर्स कामगारांचा शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
टाटा मोटर्स कामगारांचा  शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

टाटा मोटर्स कामगारांचा शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!