• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पाच हजार नाराज लघुउद्योजक भोसरी मतदारसंघात परिवर्तन घडवणार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2024
in आपले शहर
0
पाच हजार नाराज लघुउद्योजक भोसरी मतदारसंघात परिवर्तन घडवणार
0
SHARES
11
VIEWS

महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना उद्योजकांचा पाठिंबा

दहा वर्षात उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरवण्यातही सत्ताधारी अपयशी; उद्योजकांनी व्यक्त केली नाराजी

शरद पवार यांचे धोरण उद्योजकांना मान्य; कारखानदारी वाढवण्यासाठी अजित गव्हाणे यांना पाठिंबा

भोसरी 16 नोव्हेंबर : पिंपरी- चिंचवड आणि हिंजवडी औद्योगिक परिसराबरोबरच भोसरी मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला ‘इंडस्ट्रियल बेल्ट’ आहे. मात्र गेल्या दहा वर्षात या परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. लघु उद्योजकांच्या समस्या लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रस्ते आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे लघुउद्योजक त्रस्त आहेत. त्यामुळे या भागातील पाच हजाराहून अधिक लघु उद्योजकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. कारखानदारीसाठी पोषक आणि पूरक असे धोरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बोलण्यातून पुढे येत असून लघुउद्योजक यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये इंडस्ट्रियल ग्रुपच्या वतीने उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांनी अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला. लघुउद्योजकांनी यावेळी पुणे नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणानंतरही वाहतुकीची कोंडी, तळवडे, चिखली, मोशी या भागातून कनेक्टिंग रस्ते, अंतर्गत रस्त्यांची रखडलेली कामे, पुणे नाशिक रेल्वे या सगळ्या रखडलेल्या कामांवरून नाराजी व्यक्त केली. उद्योजकांनी गेल्या दहा वर्षात उद्भवलेल्या समस्यांचा पाढाच वाचला. भोसरी मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला ‘इंडस्ट्रियल बेल्ट’ आहे. या भागामध्ये अजूनही विकास आराखड्यातील रस्ते विकसित झालेले नाही. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. पाणी आणि वीजेची समस्या देखील वारंवार उद्भवत आहे. खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे .अनेकदा कामाच्या शिफ्ट बंद कराव्या लागतात. कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. मात्र गेल्या दहा वर्षात ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम देखील करण्यात आलेले नाही.या भागात शहरातून अनेक जण कामानिमित्त ये जा करतात. या भागाला प्राधान्याने रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दहा वर्षात याकडे अतिशय मोठे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तळवडे ते मोशी भागात दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. या समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी कारखानदारीला पोषक असे कोणतेच धोरण अवलंबविले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कारखानदारी वाढवण्यासाठी सर्व स्तरीय प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीच्या विकासामध्ये त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे .त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केल्याचे इंडस्ट्रियल ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. …………पाच हजार उद्योजकांचे समर्थन भोसरी विधानसभा मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी यासारख्या भागामध्ये 5 हजार हून अधिक लघुउद्योजक आहेत. या उद्योजकांनी अजित गव्हाणे यांना समर्थन दिले आहे. उच्चशिक्षित असलेल्या अजित गव्हाणे यांच्याकडून आम्हाला उद्योगवाढीच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील कारखानदारीला बळ मिळेल असे देखील उद्योजकांनी म्हटले आहे……………………………….कोणत्याही शहराला विकासाच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर शहरातच रोजगार निर्मिती झाली पाहिजे. रोजगाराच्या संधी शहरात निर्माण झाल्या पाहिजेत. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तो ‘स्कोप’ आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का असा प्रश्न मोशी, चिखली,तळवडे, भोसरी एमआयडीसी येथील प्रलंबित प्रश्नांकडे पाहून जाणवतो. हेच प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. याच मुद्द्यावर शहरातील उद्योजक देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत यातून परिवर्तन अटळ आहे .

Views: 122
Previous Post

शंकर जगताप यांना निवडून द्या; तुमच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो – नितीन गडकरी

Next Post

गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद -नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद -नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम

गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद -नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!