• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा, महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 3, 2024
in आपले शहर
0
ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा, महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन
0
SHARES
10
VIEWS

पिंपरी, दि.३ऑक्टोबर २०२४ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात “ज्येष्ठ नागरिक भवन” उभारणार असून विविध सोयी सुविधांनी युक्त असे भवन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आणि ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दि.१ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, बाबुराव फुले, ईश्वरलाल चौधरी, शांताराम सातव, हेमचंद्र जावळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उप निरीक्षक दिनकर गावडे, व्याख्याते अशोक देशमुख,डॉ. श्रीकृष्ण जोशी, आपटे काका, समाज विकास विभागाच्या रेश्मा पाटील, संतोषी चोरघे, प्रियंका रणसिंग, यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या जेष्ठ नागरिक भवनामध्ये त्यांच्यासाठी भव्य ऑडीटोरियम, सुसज्ज पार्किंग सुविधा, हॉल, ज्येष्ठ नागरिक संघासाठी स्वतंत्र कार्यालय, अशा अनेक सोयीसुविधा या भवनामध्ये नागरिकांसाठी उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम आणि जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आयुक्त सिंह पुढे म्हणाले, राज्यशासन आणि महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करून प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना अत्यंत महत्वकांशी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्यने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत उपस्थित नागरीकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम घेतले जातात. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, तसेच आपले आरोग्य सांभाळून आनंदी व निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले. प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, इतक्या मोठ्या संख्यने एकजूट असलेली पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ ही पहिलीच ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना तळागळात पोहचवण्यात या संघटनेची महत्वाची भूमिका आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेकडे आतापर्यंत ४ हजार ४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या वतीने विविध विकासात्मक प्रकल्प उभारताना ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधांचाही विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

प्रारंभी ज्येष्ठ व्याख्याते अशोक देशमुख यांनी आपल्या मधुर आणि मिश्कील वाणीतून ज्येष्ठांचे आनंदी जीवन या विषयावर मनोरंजनात्मक प्रबोधन केले. दरम्यान, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन १००% मतदानाचा निर्धार केला. यावेळी आयुक्त शेखर सिंह आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी १३४ ज्येष्ठ नागरिक महासंघ कार्यरत असून ज्येष्ठ नागरिक संघांना दरवर्षी समाज विकास विभागामार्फत भेटवस्तू देण्यात येतात. सन २०२२-२३ यावर्षी ११६ ज्येष्ठ नागरिक संघाना एलईडी टीव्ही देण्यात आले होते. तर सन २०२३-२४ यावर्षी १०२ ज्येष्ठ नागरीक संघांना साऊंड सिस्टिम व २६ ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्येकी १ टेबल व ५० खुर्च्या देण्यात आलेल्या होत्या. सन २०२४-२५ या वर्षामध्ये १३४ ज्येष्ठ नागरीक संघांना भजनी साहित्य देणेबाबत ज्येष्ठ नागरिक महासंघांने मागणी केली होती. या मागणीनुसार सर्व १३४ ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्येकी १ हार्मोनिअम (पेटी), १ तबला जोड, १२ टाळ व २ सतरंजा देण्यात येणार असून त्यापैकी ३ ज्येष्ठ नागरिक संघाना प्रातिनिधिक स्वरुपात आयुक्त शेखर सिंह आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.दुपारच्या सत्रात गीत गायन आणि नृत्य सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक तसेच विकास गायकांबळे यांनी केले.

Views: 148
Previous Post

राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार – ॲड. असीम सरोदे यांची टीका

Next Post

महात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा – डॉ. कैलास कदम महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
महात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा – डॉ. कैलास कदम महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन

महात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा - डॉ. कैलास कदम महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!