प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ सप्टेंबर २०२४ काल बालाजीनगर भोसरी येथिल क्रांतिवीर मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व मुस्लिम बांधवांनी सरबत वाटपाचा कार्यक्रम आमलात आणला गणपती विसर्जनास उपस्थित हजारो गणेश भक्तांना ज्युलस कमिटीच्यावतीने सरबताचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे सन्मान करण्यात आले यात सर्व प्रथम भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मा : गणेश जमादार साहेब यांचा सन्मान ज्युलस कमिटी अध्यक्ष सलीम शेख यांच्या हस्ते करण्यात आला, सामाजिक कार्यकर्ते सागर ओरसे यांचा सन्मान रमजान बांदेला यांच्या हस्ते करण्यात आला, उद्योजक शंकर शेठ कुऱ्हाडे यांचा सन्मान मोहम्मद भाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच विकास देवकर, नाना जाधव, पिंटू जाधव, लाला जाधव, संतोष घोडेस्वार, सुरज गलांडे यांचा ही सन्मान करण्यात आला.
जूलूस कमिटीच्या वतिने घेण्यात आलेल्या या कार्यक्रास योगदान देणारे महत्त्वाचे कार्यकर्ते जावेद भाई पठाण, नसीर भाई शेख, सालार भाई अत्तर, इसाक भाई लातूरकर, कलीमभाई शेख, सफिक भाई सय्यद, इस्माईल भाई सय्यद, साजिदभाई शेख, अजहरभाई सय्यद, सैफ अली सय्यद, सलमान पठाण, राजू पठाण, इरफान शेख, रब्बानी सय्यद, मुबारक शेख, रशीद शेख, अशपाक सय्यद, साजिद सय्यद, तसेच सायरा बानू शेख, समीरा पठाण, या कार्यक्रमास असंख्य मूस्लिम बांधव व महिलांची उपस्थिती होती.






