• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 25, 2024
in आपले शहर
0
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला
0
SHARES
11
VIEWS

शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे.

पिंपरी, दि. २५ जुलै २०२४ – अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. याठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ६५० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवणी हॉल, निराधार हॉल पिंपरी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजी नगर , काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ३०० नागरिकांना काळेवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तसेच दत्तोबा काळे इंग्रजी मिडीयम स्कूलमध्ये स्थलांतरीत केले.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर गल्ली क्र. ३,४,५,६, पवार वस्ती, पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ३१ नागरिकांना पिंपळेगुरव येथील नवीन मुला मुलींच्या शाळा नं. ५४ येथे तर १० नागरिकांना वाकड येथील आबाजी भूमकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे २० ते २५ घरांमध्ये तीन ते चार फुट पाणी शिरले होते. याठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे १०० नागरिकांचे मनपाच्या बोपखेल येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरण करण्यात आले आहे.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकुल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले. या ठिकाणांहून साचलेले पाणी तसेच घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सूचना देऊन स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे.‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, आंबेडकर नगर, सुभाष नगर, पवना नगर, जगताप नगर, संजय गांधी नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे३३० नागरिकांना कमला नेहरू शाळा, पिंपरी येथे, ४५० नागरिकांना रहाटणी शाळा येथे, ४० नागरिकांना थेरगाव शाळा येथे तर ५० नागरिकांना विवेकानंद बॉक्सिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारत नगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून १५० नागरिकांचे कासारवाडी उर्दू शाळेत, सुमारे ३०० नागरिकांचे मीनाताई ठाकरे महापालिका शाळेत, सुमारे १५० नागरिकांचे दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग महापालिका शाळेत स्थलांतर तर सुमारे ३०० नागरिकांचे जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्याप शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात असून बचावकार्य सुरू आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Views: 153
Previous Post

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुळशी धरण*दि. २५/०७/२०२४ वेळ दू. ३:०० वा*

Next Post

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!