• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 28, 2024
in आपला जिल्हा
0
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना…
0
SHARES
0
VIEWS

दि. २८ जून २०२४ – पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध मागासवर्गीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग व कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यापैकी मागासवर्गीय कल्याणकारी योजनेमध्ये माता रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महर्षी वाल्मिकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या योजनांचा समावेश आहे.माता रमाई आंबेडकर योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये तर ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत १२ वी नंतरचे वैद्यकीय अभ्यासक्रम (एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस, बी.डी.एस, बी.यु.एम.एस, बी.एच.एम.एस), अभियांत्रिकी पदवी बी.आर्क, बी.पी.टी.एच, बी.फार्म, बी.व्ही.एस.सी, आभियांत्रिकी ए.एन.एम, जी.एन.एम आणि बी.एस्सी नर्सिंग पदवीसारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमवर्षी एकदाच २५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.महर्षि वाल्मिकी योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वी वर्गात शिकत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींना सायकल घेण्यासाठी एकदाच ७ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय युवक युवतींना प्रथम वर्षासाठी एकदाच १ लाख ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थीस प्रशिक्षण फी मध्ये ९० टक्के सवलत देण्यात येणार असून यासोबतच महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) मार्फत एम.के.सी.एल अंतर्गत एमएस-सीआयटी, डी.टी.पी, टॅली आणि के.एल.आय.सी या संगणक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या सर्व योजनांची सविस्तर माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in अधिकृत संकेतस्थळावरील समाज विकास विभाग या पर्यायावर उपलब्ध असून अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, अटी शर्ती, लाभाच्या स्वरूपाची माहितीही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त लाभार्थींनी दिलेल्या मुदतीत वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे

आ

ल

Views: 225
Previous Post

इयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण मुलींसाठी मोफत पदविका अभ्यासक्रम..

Next Post

सातत्य आणि स्वप्न बघण्याची वृत्ती असेल तर यश हमखास – अमित गोरखे

Related Posts

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप
आपला जिल्हा

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

November 15, 2024
नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत        भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन
आपला जिल्हा

नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

December 23, 2023
टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी
आपला जिल्हा

bvjsbb.v

September 16, 2023
सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील  मापुस्कर गुरुकुल मध्ये  गुरुपौर्णिमा साजरी
आपला जिल्हा

सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील मापुस्कर गुरुकुल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 3, 2023
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा
आपला जिल्हा

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

February 8, 2023
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
आपला जिल्हा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

January 8, 2023
Next Post
सातत्य आणि स्वप्न बघण्याची वृत्ती असेल तर यश हमखास  – अमित गोरखे

सातत्य आणि स्वप्न बघण्याची वृत्ती असेल तर यश हमखास - अमित गोरखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!