अमित गोरखे युथ फाऊंडेशन व कलारंग संस्था यांच्या वतीने
दि:10 प्रभाग क्रमांक 10 मधील शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर, दत्तनगर, म्हाडा, मोरवाडी, लालटोपी नगर, अण्णा साहेब मगर नगर, इंदिरानगर भागातील 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला..यावेळी विद्यार्थ्यांना अमित गोरखे यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले ते म्हणाले..सातत्य आणि स्वप्न बघण्याची वृत्ती असेल तर यश हमखास मिळेल तसेच शिक्षणात स्पर्धा ठेवावी पण मनात एकमेकां बद्दल क्लेश नसावा, आपल्या शिक्षणात जेवढे परिश्रम आपल्या शिक्षकांनी घेतले तेवढेच कष्ट आपल्या आईवडिलांनी घेतलेले असतात हे आपण विसरता कामा नये. त्याच बरोबर त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या…
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मा.नगरसेविका अनुराधा ताई गोरखे यांच्या गजानन सहकारी बँक चे अध्यक्ष श्री. योगेश बाबर ,भाजप पिं.चिं. शहर उद्योग आघाडीचे अध्यक्ष श्री. अतुल इनामदार, माजी नगरसेविका शर्मिला बाबर मा.नगरसेविका,भाजपा पिं.चिं.शहर माजी उपाध्यक्षा सौ.सुप्रिया ताई चांदगुडे, स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे, मंडल अध्यक्ष श्री.राजू बाबर, भाजपा ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.रोहिणी रासकर,रा.स्व.संघा चे वस्ती रचना प्रमुख श्री शैलेश कुलकर्णी ,श्री. संदीप थोरात,श्री पंकज दलाल,श्री.अमोल गोरखे, श्री.अजित भालेराव,महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर चे अध्यक्ष श्री.रामदास जाधव, उपाध्यक्ष वाडकर साहेब , ज्येष्ठ नागरिक महासंघ उपाध्यक्षा कोकाटे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमित गोरखे म्हणाले की, हल्ली ची पिढी मोबाईल च्या जगात व्यस्त होत चाललेली आहे. शिक्षणात ही खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलां बरोबर पालकांची ही जबाबदारी वाढली आहे. अनुराधा गोरखे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर मुलांच्या संगती कडे ही लक्ष देणे गरजेचे आहे, त्यांच्या वर चांगले संस्कार ही तितकेच महत्त्वाचे आहे या कार्यक्रमातून मुलांचे मनोबल वाढावे व त्यांच्या पुढील शिक्षणात अजून चिकाटीने परिश्रम असावे या साठी हा उपक्रम घेण्यात आला. असे यावेळी सांगण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक भाऊ साहेब कोकाटे यांनी केले व आभार धनंजय खुडे यांनी मानले.