• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

मावळ लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 3, 2024
in आपले शहर
0
मावळ लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न
0
SHARES
13
VIEWS

मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी संपन्न होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारूण आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता. बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, सुनील पांढरे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे, निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी प्रमोद ओंभासे, मतमोजणी निरीक्षकांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी आनंद कटके, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप तसेच मावळ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, अर्चना यादव, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आदी उपस्थित होते.मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. मतमोजणी केंद्रातील व्यवस्थेबाबत माहिती देताना सिंगला म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. याकरिता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टींग हॉलमध्ये मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ मतमोजणी टेबल असणार आहेत. तर पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात आले असून एकूण ११३ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. *विधानसभानिहाय मतमोजणी टेबलची रचना*पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी २४ टेबल लावण्यात आले असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील. उरण विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून मतमोजणीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल लावण्यात आले असून २५ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून २३ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १६ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून २५ मतमोजणी फेऱ्या होतील.*विभागीय आयुक्तांची मतमोजणी केंद्रास भेट*आपसात समन्वय ठेऊन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज मावळ लोकसभा मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उप आयुक्त वर्षा उंटवाल, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, सुनील पांढरे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.

Views: 137
Previous Post

खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या ०३ आरोपींना देहुरोड पोलीसांकडुन अटक..

Next Post

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!