• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home मुंबई

घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 12, 2024
in मुंबई
0
घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास
0
SHARES
0
VIEWS

घारापुरी…समुद्रातलं असं ऐतिहासिक ठिकाण की जेथे पर्यटक एलिफंटा गुंफा पाहण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरुन बोटीने प्रवास करुन पोहोचतात. पण आज मतदान कर्मचाऱ्यांचे समुद्र पर्यटन घडले ते लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पाडण्यासाठी..मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून आज सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. मतदानासाठी आवश्यक असणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली होती. या लोकसभा क्षेत्रात उरण विधानसभा मतदार संघ येतो. उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून करण्यात आले. यामधील ५८ क्रमांकाचे घारापुरी मतदान केंद्र आहे. अरबी समुद्रातील बेटावरील हे मतदान केंद्र असून तेथे ३८९ पुरूष आणि ४२० महिला असे एकूण ८०९ मतदार वास्तव्य करतात. या मतदान केंद्रासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. १ मतदान केंद्राध्यक्ष, २ मतदान अधिकारी, १ मतदान सहाय्यक यांनी आज उरण मधून मतदानाचे साहित्य ताब्यात घेतले आणि सोबत पोलीस बंदोबस्त घेऊन मतदान कर्मचाऱ्यांचे हे पथक आधी जीप वाहनाने जेएनपीटी बंदरापर्यंत आले. आणि तेथून थेट बोटीने मतदान साहित्य घेऊन घारापुरीतल्या या मतदान केंद्रावर पोहोचले.लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार महत्वाचा असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील घारापुरी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा वापर करून मतदान पथकाने समुद्र मार्गाने प्रवास केला. मतदान कर्मचाऱ्यांनी प्रवासाचे हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. उरण विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांचे या सर्व घडामोडीवर लक्ष ठेऊन होते.देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध परिस्थितीत कर्तव्य बजावत असून नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Views: 126
Previous Post

डॉ. नरेंद्र दाभोळकर हंत्या प्रकरण आज कोर्ट देणार निकाल

Next Post

गोळया झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना अवघ्या दोन तासातच चिखली पोलीसांनी ठोकल्याबेडया…

Related Posts

स्मार्ट रेशनकार्ड प्रथम कामगारांना प्राधान्याने द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई

स्मार्ट रेशनकार्ड प्रथम कामगारांना प्राधान्याने द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 30, 2024
जाने माने उद्योगपत‍ि रतन टाटा नहीं रहे , PM मोदी ने बताया असाधारण इंसान
मुंबई

जगाने अनमोल रत्न गमावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली

October 10, 2024
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य
मुंबई

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

September 16, 2024
राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला.
मुंबई

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला.

July 30, 2024
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य
मुंबई

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य

July 30, 2024
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 25, 2024
Next Post
गोळया झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना अवघ्या दोन तासातच चिखली पोलीसांनी ठोकल्याबेडया…

गोळया झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना अवघ्या दोन तासातच चिखली पोलीसांनी ठोकल्याबेडया...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!