राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.