प्रतिनिधी पूणे दि. २३ मार्च २०२४ काही दिवसांनपूर्वी म्हणजे १८/०३/२०२४ रोजी मा. अमितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर यांना गृह विशेष मंत्रालय मुंबई दि 19/12/2023 नुसार मिळालेल्या अधिकराणव्ये पुणे शहर व स्थानबद्धता प्रभारी अधिकारी असताना कोंढवा पोलीस स्टेशन येथील आरोपी नामे अरबाज अहमद पटेल वय २१ वर्ष राहणार पवार हाईट्स, तिसरा मजला, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे यास उक्त अधिनियमाच्या कलम ३(२) अन्वये सदर आदेशाची बजावणी झाली असून आरोपीस आदेश बजावलेल्या दिनांक पासून स्थानबद्ध करणेचे आदेश दिले आहेत. सदर आरोपीस आदेश क्रमांक/ पीसीबी/स्थानबद्ध/कोंढवा/ पटेल/ दिनांक 18/03/2024 अन्वये उक्त अधिनियमाच्या कलम ३(२) नुसार व सदर अधिनियमांमध्ये नमूद असणाऱ्या शिस्तपालना संबंधीच्या अटी व त्या अटींच्या भंग झाल्यास असणाऱ्या तरतुदीच्या अधीन राहून अकोला कारागृह अकोला येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.सदर आरोपीचा शोध घेणे बाबत मा.संतोष सोनवणे पोलिस निरीक्षक कोंढवा पुणे यांनी तपास पथकास आदेशित केले असता सदर आरोपीचा शोध घेत असता पोलिस अम अक्षय शेंडगे व पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे अरबाज अहमद पटेल हा कोंढवा हद्दीत साळवे गार्डन येथे येणार आहे. सदर आरोपीस ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन येथे आणून त्याचे विरुद्ध एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई करण्यात आली.सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा. मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ ५, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मनसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री. लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री बालाजी दिगोळे पोलिस उप निरीक्षक, पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम रोहित पाटील, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड,पो अम भोसले,पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.