• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल – अजित पवार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 25, 2023
in आपले शहर
0
शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल – अजित पवार
0
SHARES
0
VIEWS

शतकोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

पिंपरी, पुणे (दि.२५ डिसेंबर २०२३) शहरांचा एकतर्फी विकास होत चालत नाही, तर साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक, नाट्य चळवळ वाढविण्यास भाऊसाहेब भोईर यांनी गेली अठ्ठावीस वर्ष काम केले आहे. त्यामुळे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळाला आहे. हे नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा स्वागत समिती अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे मराठी नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी आकुर्डी येथे करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अण्णा बनसोडे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, अजित गव्हाणे, विठ्ठल काटे, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत निमंत्रक आहेत. या संमेलनासाठी दहा कोटींचा निधी शासनाच्या वतीने दिला आहे. हा निधी संपूर्णपणे नाट्यसंमेलनासाठी वापरण्यात येणार नसून महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या शाखांना ठराविक प्रमाणात त्याचे वितरण केले जाईल, तसेच नाट्य संमेलनातील खर्चातून जी रक्कम शिल्लक राहील त्याच्या व्याजातूनही ज्येष्ठ कलावंत, पडद्यामागील कलाकार, कामगार यांच्यासाठी आवश्यक ती मदत, आरोग्य विमा या स्वरूपात मदत केली जाईल, तसेच जिल्हा नियोजन समितीकडून २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहराला शंभरावे नाट्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार होणार आहोत. हा आपल्या शहरवासीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. त्यासाठी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे असा विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.

मराठी माणसाचे नाटकांवर जीवापाड प्रेम !!!मराठी माणूस नाट्य वेडा आहे. त्याचे मराठी नाटकांवर जीवापाड प्रेम असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही नाटकांना गर्दी होते. मराठी माणूस आवर्जून नाटक पाहायला नाट्यगृहात जातो. तालुकास्तरावरही स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाच्या वतीने नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. नाटकांमधून केवळ मनोरंजनच नाही तर समाजाचे प्रबोधनही होते. समाजाचे प्रतिबिंब नाट्यकृती मध्ये उमटते, असे अजित पवार म्हणाले.

Views: 153
Previous Post

आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’

Next Post

ओबीसी आरक्षणात वर्गवारी करून मराठा समाजास न्याय द्यावा : डॉ. शिवानंद भानुसे महाराष्ट्रातील पहिलीच सामाजिक सलोखा आरक्षण परिषद यशस्वी

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
ओबीसी आरक्षणात वर्गवारी करून मराठा समाजास न्याय द्यावा : डॉ. शिवानंद भानुसे महाराष्ट्रातील पहिलीच सामाजिक सलोखा आरक्षण परिषद यशस्वी

ओबीसी आरक्षणात वर्गवारी करून मराठा समाजास न्याय द्यावा : डॉ. शिवानंद भानुसे महाराष्ट्रातील पहिलीच सामाजिक सलोखा आरक्षण परिषद यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!