• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 8, 2023
in आपले शहर
0
टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी
0
SHARES
9
VIEWS

पिंपरी, प्रतिनिधी – टाटा मोटर्स पिंपरी यांच्या वतीने खेड तालुक्यातील शिवे गावात ज्ञानदीप माध्यमिक शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा बांधण्यात आली. या प्रयोगशाळेचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 8) करण्यात आले. शाळेच्या इमारतीपासून प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा टाटा मोटर्सच्या वतीने उभारण्यात आल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी टाटा मोटर्स कायम प्रयत्नशील असून शिवे गावातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.

प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी टाटा मोटर्सचे पिंपरी प्लांट हेड सुनील कुमार तिवारी, एच आर हेड प्रणव कुमार, फायनान्स हेड अरींदम दास, सिनियर जीएम उमेश तांबोलकर, विश्वेश देव्हारे, विजयकुमार सिंग, संजीव काळे, नितीन कळमकर, नितीन काशीद, राकेश पांडे, पवन त्रिवेदी, सुरेंद्र कुलकर्णी, उमेश मंगलोरे, अदील बाला, रोहित सरोज, शाळेचे पदाधिकारी विनायक शिवेकर, नंदकुमार शिवेकर, धनंजय भांडवलकर, दत्तात्रय शिवेकर, दत्तात्रय अडवळे, कालुदास सातपुते, शांताराम खुटवळ, नामदेव गडदे, रोहिदास गडदे, शांताराम सातपुते, शंकर साळुंखे, दत्तात्रय शिवेकर, अरुण साळुंखे, दादाभाऊ शिवेकर, शांताराम गिधे, शांताराम भालसिंग, मनोहर शिवेकर आदी उपस्थित होते.सुनील कुमार तिवारी म्हणाले, ग्रामस्थांच्या प्रयत्नांना टाटा मोटर्सने केवळ बळ दिले आणि गावात अनेक चांगल्या सुविधा निर्माण झाल्या. हे टाटा मोटर्स सह ग्रामस्थांचेही यश आहे. इथले विद्यार्थी अतिशय चिकित्सक आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बरोबर संस्कृती आणि विचार काय देतो हे देखील महत्वाचे आहे. सुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल, असेही ते म्हणाले.टाटा मोटर्सचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी दरवर्षी मार्च व सप्टेंबर महिन्यात जमशेदजी टाटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवितात. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य समाजातील विविध घटकांसोबत वेळ घालवून वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर उपक्रम राबवितात. आपल्याकडे असलेली कौशल्ये गरजू लोकांना देण्याचा याध्यामातून प्रयत्न केला जातो. सप्टेंबर 2023 मध्ये या उपक्रमाचे 20वे चरण सुरू झाले. याचा शुभारंभ देखील शिवे येथील कार्यक्रमातून करण्यात आला. टाटा मोटर्स मधील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी गटचर्चा करून त्यांच्याकडील कौशल्य विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.सन 1992 साली टाटा मोटर्सने शिवे गावात ज्ञानदीप विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करून दिले. त्यानंतर सातत्याने टाटा मोटर्सने शिवे गावात आरोग्य शिबिरे, चारसुत्री भात शेती, निर्धुर चुली, सामुदायिक विवाह सोहळा, मागेल त्याला शौचालय असे अनेक उपक्रम राबविले. शिवे गावातील माध्यमिक शाळेत पंचक्रोशीतील 173 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अद्ययावत प्रयोगशाळेची आवश्यकता होती. ही बाब टाटा मोटर्सच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर तात्काळ अंमलबजावणी करत प्रयोगशाळा तयार करण्यात आली. आजवर केवळ एका कपाटात असलेली प्रयोगशाळा आता प्रशस्त हॉल मध्ये सुरू झाली आहे. यामध्ये सुमारे 70 प्रयोग मांडण्यात आले असून प्रयोगशाळेचे साहित्य मांडण्यासाठी खास सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.वैज्ञानिक प्रयोगशाळा लोकार्पणाचा कार्यक्रम असल्याने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी हृदय, वृक्क, उत्सर्जन संस्था, प्रकाश संश्लेशण, मूलदाब, केंद्रक, स्पायरोगायरा, प्रकाशवर्ती प्रतिसाद, विद्युतघट, बायोगॅस, चेतापेशी, अमिबा, गुणसूत्र रचना, फुलांचे अंतरंग अशा वैज्ञानिक प्रयोगाच्या रांगोळ्या काढल्या. त्याची उपस्थितांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी रांगोळ्यांबाबत माहिती दिली.प्रयोगशाळेचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले. काहीजण वैज्ञानिक प्रयोग करून जादूटोणा केल्याचे भासवतात. अशा लोकांना बळी पडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी कॅल्शियम कॉर्बाइट आणि पाण्याचा वापर करून दिवा पेटवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केले.शहरी भागात चांगल्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधा असतात. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी या सुविधांपासून वंचित असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे टाटा मोटर्सने पुढाकार घेऊन शाळा बांधली आणि आता अद्ययावत प्रयोगशाळा देखील बांधण्यात आली.पूर्वी गावात सातवी पर्यंत शाळा उपलब्ध होती. पुढील शिक्षणाची सुविधा नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षण गळती झाली. टाटा कंपनीने शाळा बांधून दिली आणि चांगल्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. आजवर शाळेतील दीड हजार विद्यार्थी शाळेतून पास आऊट होऊन समाजात चांगले काम करीत आहेत. हे केवळ टाटा मोटर्स मुळे शक्य झाले आहे. गावातील अनेक कामे टाटा मोटर्सच्या वतीने करण्यात आली. शैक्षणिक संसाधनांसह क्रीडा स्पर्धांचे व्यासपीठ देखील उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सांस्कृतिक व्यासपीठ देखील टाटा कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. टाटा मोटर्स कंपनीबद्दल प्रेमच नाही तर खूप आदर वाटतो, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.टाटा मोटर्स सहकारी पतसंस्थेच्या वतीने संगणक कक्ष उभारण्यात येणार आहे. याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Views: 144
Previous Post

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडून ‘‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’’ चा संदेश!- भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या भावना- प्रा. डॉ. तानाजी सावंत, प्रा. शिवाजी सावंत यांचे अभिनंदन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
तलवाडा येथील शुभम बियरबार वर दारूबंदी कायद्याचे उल्लघ्नंन

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडून ‘‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’’ चा संदेश!- भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या भावना- प्रा. डॉ. तानाजी सावंत, प्रा. शिवाजी सावंत यांचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!